पूनम सिन्हांच्या उमेदवारीबाबत राजनाथ सिंह म्हणतात…

लखनौ – नुकताच भाजपला रामराम ठोकून काँग्रेसमध्ये सामील झालेल्या शत्रुघ्न सिन्हा यांच्या पत्नी पूनम सिन्हा यांनी आज समाजवादी पक्षामध्ये प्रवेश केला आहे. पूनम सिन्हा यांना सपा-बसपा आघाडीकडून लखनौ लोकसभा मतदारसंघामधून उमेदवारी घोषित करण्यात आली आहे.
दरम्यान, लखनौ लोकसभा मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर पक्षाचे जेष्ठ नेते तथा केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह हे निवडणूक लढवत आहेत. पूनम सिन्हा यांना समाजवादी पक्षातर्फे उमेदवारी देण्यात आल्याबाबत राजनाथ सिंह यांनी प्रतिक्रिया दिली असून ते म्हणतात, “आपल्या देशामध्ये लोकशाही असल्याने निवडणुकांमध्ये कोणी-ना-कोणी विरोधात उभं राहणं साहजिकच आहे. मी विरोधी उमेदवार म्हणून पूनम सिन्हा यांचे स्वागत करतो. लखनौ हे शहर आपल्या मानमर्यादेसाठी देशभरात ओळखले जाते. आम्ही ही निवडणूक लढवताना लखनौच्या मानमर्यादेला तडा जाऊ देणार नाही.”

Leave A Reply

Your email address will not be published.