पुस्तकाच्या गावाला खड्ड्यांचे ग्रहण

मंत्र्यांचे दौर खड्ड्यातूनच, दुरुस्तीकडे प्रशासनासह लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष
पाचगणी,  (प्रतिनिधी) –
पुस्तकाचे गाव म्हणून नावारुपाला आल्यानंतर महाबळेश्‍वर तालुक्‍यातील भिलार या गावाला मुख्यमंत्र्यांसह इतर मंत्र्यांचे वारंवार दौरे झाले. मात्र, त्यानंतरही या गावातील रस्त्यांवर असणाऱ्या खड्ड्यांमध्ये साधा मुरुमही भरण्यात आलेला नाही. यावरुनच लोकप्रतिनिधींसह प्रशासनाची उदासिनता प्रकर्षाने दिसते. परंतु, प्रशासनाचे उदासिनतेमुळे भिलार गावाला लागलेले खड्ड्यांचे ग्रहण कधी सुटणार? असा प्रश्‍न उपस्थित होऊ लागला आहे.
भिलार (पुस्तकाचे गाव) येथील रस्त्याची अवस्था ही अतिशय दयनीय झाली आहे. रस्ता खड्यात की खड्डे रस्त्यात अशी परिस्थिती भिलारमध्ये निर्माण झाली आहे. 4 मे 2016 मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस, शिक्षण मंत्री विनोद तावडे, बांधकाम विभाग मंत्री एकनाथ शिंदे आदी मान्यवर व लेखक, कवी प्रकाशक, वाचक यांच्या हस्ते भिलार या गावाचे पुस्तकाचे गाव म्हणून नामकरण झाले. त्याचवेळी विनोद तावडे यांनी भिलार पुस्तकाचे गाव दत्तक घेऊन संपूर्ण गावाचा कायापलट करणार असल्याचे जाहिर केले. रस्त्याची कामे, अंडरग्राऊंड, स्ट्रेट लाईट आदी कामेही करणार असल्याचे आश्वासन यावेळी तावडे यांनी दिले होते.
पुस्तकाचे गाव हे देशात प्रथम तर जगात दुसऱ्या क्रमकांवर आल्याने या गावात पर्यटकांबरोबर वाचक, शालेय विद्यार्थी, तसेच अनेक मंत्री मोहदय भेटी देत असतात. तसेच या गावाच्या शेजारील गावे दानावली, उंबरी, कासवंड, घोटघर, आखेगणी, धावली आधी गावाचे मुख्य बाजारपेठ असल्याने सततची रहदारी व कायम रस्त्यावर वाहतूक वाढल्याने त्याची डागडुजी होणे अपेक्षित होते. पण या रस्त्याकडे स्थानिक स्थायी स्वराज संस्था या भागातील लोकप्रतिनिधी यांचे येजा होत असते. पण गेली दोन वर्षांपासून चांगलीच रेलचाल वाढली आहे. या रस्त्यावरील खड्डे दिसत नाहीत ही शोकांतिका आहे. याकडे जर या लोकप्रतिनिधींनी जर वेळीच लक्ष दिले असते तर रस्त्याची ही अवस्था झाली नसती, गावाला भेट देणारे पर्यटक वाचक व स्थानिक वाहन चालक या रस्त्यामुळे नाराजीचे सूर उमटत आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)