पुसेसावळी-गणेशवाडी रस्त्याच्या दुरुस्तीसाठी ग्रामस्थांचे उपोषण

 

पुसेसावळी, दि. 14 (प्रतिनिधी) – पुसेसावळी ते मांडवे शिवार गणेशवाडी या रस्त्याची दुरवस्था झाली असून मोठमोठे खड्डे पडल्याने रस्त्याची चाळण झाली आहे. प्रशासनाकडे रस्ता दुरुस्तीसाठी वारंवार मागणी करूनही दुर्लक्ष केल्यामुळे ग्रामस्थांनी गुरुवारपासून उपोषण सुरू केले आहे. रस्ता दुरुस्तीबाबत लेखी आश्वासन मिळत नाही, तोपर्यंत उपोषण मागे घेणार नसल्याचा इशारा उपोषणकर्त्यांनी दिला आहे.
पुसेसावळी गावापासून उत्तरेस दोन किमी अंतरावर मांडवे शिवार वस्ती आहे. पाचशे लोकसंख्येच्या वस्तीत गावामध्ये येण्यासाठी दक्षिणोत्तर पुसेसावळी गणेशवाडी रस्ता आहे. 2005 मध्ये पुसेसावळी ते मांडवे शिवार या दोन किमी रस्त्यापैकी फक्त सहाशे मीटर रस्ता डांबरीकरण झाला आहे. परंतु, हा रस्ताही पूर्णपणे उखडलेला आहे. उर्वरीत रस्ताही निकृष्ट दर्जाचा झाला आहे.पावसाळ्यात पर्यायी रस्ता नसल्याने ग्रामस्थांना या रस्त्या वरुन जावे लागत असून मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. वाहन चालवणे, शेतमाल ने-आण, ऊस वाहतूक करणे, अशक्‍यप्राय झाले आहे. रस्ता दुरुस्तीबाबत ग्रामस्थांनी सर्व शासकीय व प्रशासकीय यंत्रणा, लोकप्रतिनिधी यांना वारंवार अर्ज, निवेदन देवूनही दखल न घेतल्यामुळे ग्रामस्थांनी बेमुदत उपोषण सुरू केले आहे. उपोषणास प्रदीप माने, संतोष कदम, लहू कदम, अभिजीत पळसकर, हेमंत माने, सुरेश जाधव, प्रकाश माने, जयवंत जाधव, सुभाष जाधव यांनी उपोषणात सहभाग घेतला आहे. जोपर्यंत रस्ता दुरुस्तीबाबत लेखी आशवासन मिळत नाही. तोपर्यंत उपोषण मागे घेणार नसल्याचा आक्रमक पवित्रा ग्रामस्थांनी घेतला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)