पुर्नवसनाची जमिन लाटण्याचा प्रयत्न करणारे 48 तासात गजाआड

समर्थ पोलीसांची कामगिरी

पुणे, दि. 26 बनावट दस्तऐवज तयार करुन पुर्नवसनाची 69 गुंठे जमिन लाटण्याचा प्रयत्न करणाऱ्या पाच आरोपींना समर्थ पोलिसांनी 48 तासात गजाआड केले. यामध्ये बनावट कागदपत्रे तयार करण्यात सराईत असलेल्या एका गुन्हेगाराचाही समावेश आहे.गणेशोत्सवाच्या धामधुमित देखील समर्थ पोलिसांनी ही कामगिरी केली.
कृष्णा मारुती आमले, शंकर आमले, रामप्रभू तराळे, स्वप्न्निल घोडके, नितीन वहाळकर अशी अटक आरोपींची नावे आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

यासंदर्भात सविस्तर असे की, पुर्नवसन विभागाचे उप जिल्हाधिकारी उत्तम पाटील यांनी समर्थ पोलीस ठाण्यात एक फिर्याद दाखल केली होती. यामध्ये कासारसाई पुर्नवस प्रकल्पातील प्रकल्पग्रस्तांच्या बनावट नावाने तसेच जिल्हा पुर्नवसन अधिकाऱ्यांच्या नावाने बनावट जमिनीचे आदेश तयार करुन शासनाची फसवणूक केल्याचे म्हटले होते. आरोपींनी बनावट आदेश तयार करुन जमिन धारण केल्याचे दर्शवले. तसेच संबंधित जमिन धारकांकडून 69 गुंठे जमिन खरेदी केल्याचे दस्त केले. या दस्तामध्ये सदर जमिन 72 लाख 60 हजार रुपये किंमतीस खरेदी केल्याचे दर्शवले गेले. गुन्हा दाखल होताच समर्थ पोलिसांनी दस्तऐवजावरील साक्षीदार व ओळख देणाऱ्या लोकांची माहिती काढली. यानंतर तातडीने हालचाल करुन मुळशी तालुक्‍यातून आरोपींना ताब्यात घेतले. ही जमिन कृष्णा आमले व शंकर आमले यांनी खरेदी केल्याचे दाखवण्यात आले होते. तर यासाठी बनावट कागदपत्रे नितीन वहाळकर व रामप्रभू तराळे यांनी केली होती.

प्रकल्पग्रस्तांच्या नावाने बनावट महिलांना नोंदणी कार्यालयात हजर केले. त्यांची शासकीय ओळख दर्शवणारे पॅन/आधारकार्डसारखे दस्तऐवज देखील बनावटल केले गेले. नितीन वहाळकर हा अशा प्रकारचे गुन्हे करण्यात सराईत असून त्याच्याविरुध्द यापूर्वी खडक, विश्रामबाग, खडकी , स्वारगेट आदी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.
ही कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरुण वायकर यांच्या मार्गदर्शनाखली पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर कापुरे, पोलीस हवालदार काळे, पोलीस शिपाई निलेश साबळे, पवार, गोरखे ,पोलीस नाईक गायकवाड व महिला पोलीस शिपाई ब्राम्हणे यांच्या पथकाने केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)