पुरोगामी विचारांच्या गादीवर प्रतिगामी बसल्याचा वास

ऍड. प्रकाश आंबेडकर : वंचित आघाडीच्या पाठीशी उभे रहा

सातारा – साताऱ्याची गादी म्हणजे परिवर्तन व पुरोगामी विचारांची. मात्र, आज या गादीवर प्रतिगामी बसल्याचा वास येतोय, अशी शंका ऍड.प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केली. त्याचबरोबर एखाद्या भांड्यातील पाणी गढुळ झाले असेल तर पाणी बदलण्याची वेळ आता आली असल्याचे सांगत सातारा लोकसभा मतदार संघात उमेदवार उतरविण्याचे संकेत दिले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

वंचित बहुजन आघाडीच्या सत्ता संपादन निर्धार सभेत ते बोलत होते. यावेळी ऍड.विजयराव मोरे, पद्मश्री लक्ष्मण माने, आ.हरिभाऊ बदे, शंकरराव लिंगे, अल्ताफ शिकलगार, पार्थ पोळके, सचिन माळी, नवनाथ पडळकर, सुकुमार कांबळे, प्रा.किसन चव्हाण यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

पुढे बोलताना ऍड.प्रकाश आंबेडकर म्हणाले, शेतकऱ्यांच्या पिकाला हमीभाव मिळावा म्हणून सरकारने नवीन कायदा आणला मात्र, शेतीमाल खरेदी करण्यासाठी यंत्रणाचा उभी केली नाही. परिणामी भांडवलदार व व्यापाऱ्यांचे अप्रत्यक्ष भले करण्याचे काम सरकार करित आहे. तसेच आर्थिक दृष्ट्या मागास वर्गासाठी दहा टक्के आरक्षण आणून एक प्रकारे सरकारची वैचारिक दिवाळखोरी स्पष्ट झाली आहे.

मात्र, या सरकारच्या या निर्णयाचा खऱ्या अर्थाने लाभ मुस्लिम समाजालाच मोठ्या प्रमाणात होणार असल्याची गुगली ऍड.आंबेडकर यांनी टाकली. तसेच लोकांचा सर्वाधिक विश्‍वास असलेल्या न्याय व्यवस्थेत हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न सरकार करित असल्याचा बाबत चिंता व्यक्त करून ऍड.आंबेडकर म्हणाले, संविधानामुळेच वंचित घटकांना विकासाची व्दारे खुली झालेली आहेत. त्यामुळे संविधान चिरंतन टिकले पाहिजे, यासाठी सर्वानी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)