पुरुष टेबल टेनिस संघाला ऐतिहासिक कांस्य

महिला टेबल टेनिस संघ उपान्त्यपूर्व फेरीत पराभूत
जकार्ता- भारतीय पुरुष टेबल टेनिस संघाला बलाढ्य दक्षिण कोरियाविरुद्ध उपान्त्य फेरीत पराभव पत्करावा लागला. परंतु या पराभवानंतरही भारतीय पुरुष संघाने आशियाई क्रीडास्पर्धेतील पहिल्यावहिल्या ऐतिहासिक कांस्यपदकाची कमाई केली. भारताच्या महिला संघाने तीनपैकी दोन साखळी सामने जिंकताना सांघिक स्पर्धेच्या उपान्त्यपूर्व फेरीत धडक मारली होती. मात्र हॉंगकॉंगकडून पराभव पत्करावा लागल्यामुळे त्यांचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले.

एकतर्फी ठरलेल्या उपान्त्य लढतीत दक्षिण कोरियाने भारतीय पुरुष संघाचा 3-0 असा पराभव करताना अंतिम फेरीत धडक मारली. सुवर्णपदकासाठी दक्षिण कोरियासमोर चीनचे कडवे आव्हान आहे. गेल्या इंचेऑन आशियाई स्पर्धेतील अंतिम लढतीची ही पुनरावृत्ती ठरेल. तत्पूर्वी ग्यानशेखरन साथियन, अचंता शरथ कमल आणि अँथनी अणलराज यांचा समावेश असलेल्या भारतीय पुरुष संघाचा कोरियास.मोर निभाव लागला नाही.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पहिल्या एकेरी लढतीत ग्यानलशेखरन साथियनला ली सॅंगसू याच्याविरुद्ध 11-9, 9-11, 3-11, 3-11 असा पराभव पत्करावा लागला. ही परंपरा त्यानंतरच्या सामन्यांमध्येही कायम राहिली. विश्‍वक्रमवारीत 33व्या क्रमांकावर असलेल्या शरथ कमलकडून मोठ्या अपेक्षा होत्या. त्यानेही यंग सिक जेओंगला जबरदस्त लढत दिली. मात्र यंगने 11-9., 11-9, 6-11, 7-11, 11-8 अशी बाजी मारताना दक्षिण कोरियाला 2-0 अशी आघाडी मिळवून दिली. निर्णायक लढतीत 22 वर्षीय वूजिन जॅंगने अमलराजला 11-5, 11-7, 4-11, 11-7 असे पराभूत करताना कोरियाच्या विजयावर शिक्‍कामोर्तब केले.

त्याआधी भारतीय पुरुष टेबल टेनिस संघाने उपान्त्यपूर्व फेरीत बलाढ्य जपानचा 3-1 असा पराभव करताना टेबल टेनिसमधील भारताच्या पहिल्यावहिल्या पदकाची निश्‍चिती केली होती. आशियाई क्रीडास्पर्धेत 1958 मध्ये टेबल टेनिसचा पहिल्यांदा समावेश झाल्यानंतर भारताला या क्रीडाप्रकारांत मिळालेले हे पहिलेच पदक ठरले आहे. चीनने 61 सुवर्ण, जपानने 20 सुवर्ण व दक्षिण कोरियाने 10 सुवर्णपदके जिंकून टेबल टेनिसवर वर्चस्व गाजविले आहे.

तत्पूर्वी भारतीय पुरुष संघाने अरब अमिराती आणि व्हिएतनाम यांच्यावर एकतर्फी मात करताना आगेकूच केली होती. पुरुष सांघिक विभागात भारतीय पुरुष टेबल टेनिस संघाने संयुक्‍त अरब अमिरातीचा पराभव करताना विजयी सलामी दिली. अचंता शरथ कमल, जी. साथियन आणि हरमीत देसाई या भारतीय खेळाडूंनी आपापले एकेरी सामने सहज जिंकले. तैपेई चीनविरुद्ध एकमेव पराभव पत्करल्यानंतर भारतीय पुरुष संघाने संयुक्‍त अरब अमिरातीवर 3-0 अशी मात करताना आगेकूच केली. तसेच तिसऱ्या गटसाखळी लढतीत व्हिएतनामचाही 3-0 असा धुव्वा उडवून भारतीय पुरुष संघाने ड गटांत तिसऱ्या विजयाची नोंद केली होती.

भारतीय महिलांना हॉंगकॉंगविरुद्ध 1-3 असा पराभव स्वीकारावा लागला. त्याआधी अनुभवी मौमा दाससह अयहिका मुखर्जी व सुतीर्था मुखर्जी यांचा समावेश असलेल्या भारतीय महिला टेबल टेनिस संघाने पहिल्या गटसाखळी सामन्यात कतारचा 3-0 असा एकतर्फी पराभव करीत विजयी सलामी दिली होती. दुसऱ्या साखळी सामन्यात बलाढ्य चीनविरुद्ध भारतीय महिलांना 0-3 असा पराभव पत्करावा लागला. परंतु तिसऱ्या साखळी सामन्यात इराणचे आव्हान 3-1 असे मोडून काढताना भारतीय महिला टेबल टेनिस संघाने बाद फेरीत प्रवेश केला.

कतारविरुद्धच्या साखळी लढतीत मौमा दासने माहा अलीवर 11-3, 11-2, 11-4 असा विजय मिळवून भारताचे खाते उघडले. अयहिका मुखर्जीने अलिया मोहम्मदचा 11-2, 12-10, 11-2, 11-3 असा धुव्वा उडविताना भारताला 2-0 असे आघाडीवर नेले. तर सुतीर्थाने माहा फरमर्झीवर 11-3,1 1-3, 11-6 अशी मात करताना भारताच्या विजयाची पूर्तता केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)