पुरस्काराने जबाबदारी वाढली- बिडवे

किरण बिडवे यांना समाजरत्न पुरस्कार
रांजणगाव देशमुख – राष्ट्रीय नाभिक महासंघ व महाराष्ट्र नाभिक महासंघाच्या वतीने समाजसेवेत उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल नाभिक समाजाचे अहमदनगर जिल्हाध्यक्ष किरण बिडवे यांना विविध सामाजिक उपक्रम राबविल्याबद्दल पुणे येथे समाजरत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
गणेश कला क्रीडा रंगमंच पुणे येथे खासदार अमर साबळे, नाभिक महामंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष भगवानराव बिडवे, प्रदेशाध्यक्ष दत्ता अनारसे, नागपूर महापालिका समितीचे अध्यक्ष बंडोपंत राऊत, सिने अभिनेते गणेश यादव, केश कला बोर्डाचे अध्यक्ष नंदकिशोर वर्मा, जगदीश नाई आदी मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला.
किरण बिडवे यांनी समाजाकरिता श्री संत सेना मंदिर विद्यार्थ्यांकरिता वसतिगृह अशा प्रकारचे विविध सामाजिक उपक्रम राबविल्याबद्दल त्यांना हा पुरस्कार देण्यात आला. यावेळी किरण बिडवे म्हणाले की, नाभिक समाज हा अनेक वर्षांपासून शासकीय सवलतींपासून वंचित राहिला असून समाज एकजूट करून समाजाचे आराध्य दैवत संत सेना महाराजांचे मंदिर व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना वसतिगृहाची उभारणी केली. या पुरस्काराने माझी जबाबदारी वाढली आहे. पुढे अजून मोठे काम करणार आहे.
या प्रसंगी पश्‍चिम महाराष्ट्र अध्यक्ष मारुती टिपुगडे, पुणे जिल्हाध्यक्ष अंकुश खडके, दिलीप जाधव, सोमनाथ व्यवहारे, राजेंद्र कोहडके, दत्तात्रय आहेर, सचिन वैद्य, मनोज बिडवे, संजय सोनवणे, मुकुंद जाधव, गोपीनाथ जाधव, गोरक्ष वैद्य, संतोष चव्हाण, कचेश्वर कदम, दीपक चव्हाण, रमेश आहिरे, विनायक खंडागळे, पप्पू निकम, विनायक बिडवे, सुरेश कदम, गणेश बिडवे, विलास अनर्थे, गणेश वाघ, आदिनाथ वाघ, प्रवीण आहेर, एकनाथ बोरसे आदी मान्यवर उपस्थित होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)