पुरंदरमध्ये महाराष्ट्र दिनी महाश्रमदान

संग्रहित छायाचित्र

शासकीय अधिकारी करणार श्रमदान


जलमित्र करणार जलजागर

काळदरी – महाराष्ट्र शासन आणि पाणी फाउंडेशन यांच्या संयुक्‍त विद्यमाने पुरंदर तालुक्‍यात सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा 2018 ची मोहीम हाती घेण्यात आली आहे. या माध्यमातून मोठ्या प्रमाणात जल व मृदासंधारणाची कामे करण्यात येत आहे. तसेच यास नागरिकांचा मोठा सहभाग मिळत आहे. तर मंगळवारी (दि. 1) मे रोजी महाराष्ट्र दिनाचा सोहळा मोठ्या उत्साहात साजरा होत असतानाच तालुक्‍यातील सुकलवाडी, पानवडी, पोखर, उदाचीवाडी, वाघापूर या ठिकाणी महाश्रमदान मोहीम राबविण्यात येणार आहे. यासाठी सर्वांनी लोकसहभाग घ्यावा, असे आवाहन पुरंदर तालुका पाणी फाउंडेशनचे समन्वयक अंबादास बामदळे यांनी केले आहे.

8 एप्रिल ते 22 मे या काळात संपूर्ण राज्यात पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून मोहीम राबविण्यात येत आहे. तालुक्‍यातील 23 गावांमध्ये जलसंधारणाची मोहीम राबविण्यात येत आहे. आत्तापर्यंत या मोहिमेस प्रचंड प्रतिसाद मिळत असतानाच जिल्ह्यातील अनेक कंपन्या, सामाजिक संस्था तसेच संपूर्ण शासकीय यंत्रणांची जोड लाभली आहे. या सर्वांचा परिपाक म्हणून कोट्यवधी रुपयांची कामे केवळ लोकसहभागातून झाली आहे.

1 मे रोजी संपूर्ण तालुक्‍यात महाश्रमदान मोहीम राबविण्यात येत आहे. यामध्ये जिल्हाधिकारी नवलकिशोर राम, मुख्य कार्यकारी अधिकारी सूरज मांढरे, प्रांताधिकारी संजय आसवले, तहसीलदार सचिन गिरी, तालुका कृषी अधिकारी देवेंद्र ढगे, गटविकास अधिकारी श्रीकृष्ण वेणीकर, उपविभागीय पोलीस अधिकारी आण्णासाहेब जाधव, सासवड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक क्रांतिकुमार पाटील, सहायक गटविकास अधिकारी लक्ष्मण वाजे, सर्व शासकीय संस्था यांनी सहभाग घेऊन श्रमदान करणार आहेत. या मोहिमेत सहभाग घेण्यासाठी पुणे, मुंबई येथील व्यवसायानिमित्त गेलेले रहिवाशी तसेच विविध कंपन्यांचे प्रतिनिधी, अधिकारी असे सुमारे चार ते पाच हजार नागरिक सहभागी होणार आहेत. त्यामुळे गावातील स्थानिक नागरिक आणि तालुक्‍यातील व्यक्‍तींनी मोठ्या संख्येने या मोहिमेत सहभाग नोंदवून ती यशस्वी करण्याचे आवाहन समन्वयक रुपेश शिंदे यांनी केले आहे.

चार गावांमध्ये श्रमदान 
जिल्हास्तरीय अहिल्यादेवी होळकर जलमित्र पुरस्कार प्राप्त पानवडी गावात डॉ. अविनाश पोळ यांच्या मार्गदर्शनाखाली अजिंक्‍यतारा महाश्रमदान ग्रुप श्रमदान करणार आहे. सुकलवाडी, वाघापूर, उदाचीवाडी, पानवडी या चार गावात सकाळी 6 ते 10 वाजता श्रमदान होणार आहे. तर पोखर या गावात दुपारी 3 ते सायंकाळी 7 वाजता महाश्रमदान होणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)