पुरंदरने शिक्षणाचा अर्थ शिकवला – जरग

जेजुरी- पुरंदर तसा अवर्षणग्रस्त तालुका मानला जातो. मात्र प्रतिकूल परिस्थितीत जिद्दीच्या जोरावर उच्चशिक्षित होऊन स्वतःच्या पायावर उभे राहणाऱ्यांची संख्या मोठी आहे. पुरंदरकरांना शिक्षणाचा अर्थ कळला आहे आणि त्यांनी तो इतरांना शिकवला आहे, असे प्रतिपादन राज्याचे माजी शिक्षण संचालक नामदेव जरग यांनी केले आहे.
येथील जय मल्हार ज्येष्ठ नागरिक संघटनेच्या वतीने दहावी आणि बारावी, तसेच विविध शालेय स्पर्धांमधून उत्तम गुणवत्ता प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांच्या गुणगौरव समारंभाचे आयोजन केले होते. यावेळी जरग बोलत होते. यावेळी डॉ. रामदास कुटे, प्राचार्य नंदकुमार सागर, प्राचार्या डॉ. चाफळकर, ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष चंद्रकांत खोमणे, उपाध्यक्ष उषा आगलावे उपस्थित होते. समारंभात जेजुरी व परिसरातील शाळा महाविद्यालयांतील 34 गुणवंत विद्यार्थ्यांचा प्रशस्तीपत्र, सन्मान चिन्ह, व रोख रकमेचे बक्षीस देऊन गौरव करण्यात आला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)