पुरंदरच्या दरीत ट्रान्जेट मिक्‍सर कोसळून तीन जण ठार

चालकाने मारली उडी; तीघे गंभीर जखमी

सासवड- घेरा पुरंदर (ता. पुरंदर) हद्दीतील पुरंदर किल्ला येथे ट्रान्जेट मिक्‍सर वाहनाच्या अपघातात तीन मजूर जागीच ठार तर तीन मजूर गंभीर जखमी झाल्याची दुर्घटना घडली आहे. याबाबत प्रशांत भुजीगा धुळूगडे (वय 28, रा. मु .पो. सुळकुड, ता. कागल, जि. कोल्हापुर) यांनी फिर्याद दिली असुन आरोपी राजकुमार रामकरण विश्वकर्मा (वय 23, धंदा चालक, रा. घर नंबर 23 हाटवा, बरहटोला, पो. हाटवा खास, ता. सिहवल, जि. सिध्दी, मध्यप्रदेश) याला अटक करण्यात आली आहे.

सासवड पोलिसांनी दिलेली माहिती अशी, बुधवारी (दि. 17) सायंकाळी 05:45 वाजण्याच्या सुमारास मौजे घेरा पुरंदर (ता.पुरंदर) गावच्या हद्दीतील पुरंदर किल्ल्यावरील तळ्याच्या दुरुस्तीचे काम चालू असून चालक राजकुमार विश्वकर्मा हा ट्रान्जेट मिक्‍सर (क्र. एमएच 12 एफसी 6026) माल भरून किल्ल्याच्या मेनगेटवर असलेल्या बंचिंग प्लांट वरून माल भरुन मुरारबाजी चौक येथे असणाऱ्या तलावांमध्ये माल खाली करण्याकरीता गेला असता तेथील चौकातून वाहन वळवून मेन गेटवर घेत असताना उतारावर वाहनावरील त्याचा ताबा सुटल्याने मिक्‍सर मागे आला आणि दरीमध्ये सुमारे 20 ते 40 फूट खाली कोसळला. चालक आरोपी राजकुमार विश्वकर्मा याने मिक्‍सर गाडीतून बाहेर उडी मारली. गाडीत असलेले आनंद कंपनी (वय 20, रा. मध्य प्रदेश), मोनो रमेश बैगा (वय 21, रा. मध्य प्रदेश), अनिल ब्रिजनंदन पनिका (वय 21, रा. मध्य प्रदेश) यांचा जागीच मृत्यू झाला तर
तर, गाडीतील अन्य मजुरांना गंभीर दुखापत झाली आहे. वाहनाचा मिक्‍सर व बॉडी वेगळी झाली आहे. पुढील तपास सासवड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक ए. बी. घोलप करीत आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.