पुन्हा सनी देओल – अमिषा पटेलची जोडी पडद्यावर झळकणार

अभिनेता सनी देओलचा ‘यमला पगला दिवाना-3 ‘ हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार असून, त्यापूर्वी सनी आणखी एक चित्रपट दर्शकांसाठी घेऊन येत आहेत. या चित्रपटामध्ये सनी देओल, अभिनेत्री अमिषा पटेल हिच्यासोबत दिसणार आहे. अतिशय लोकप्रिय झालेल्या “गदर-एक प्रेमकथा’ या चित्रपटानंतर सनी-अमिषाची जोडी तब्बल बारा बर्षांच्या काळानंतर प्रेक्षकांना पहावयास मिळणार आहे. सनी आणि अमिषाच्या या चित्रपटाचे नाव “भैय्याजी सुपरहिट’ असे असून, हा चित्रपट 19 ऑक्‍टोबर रोजी प्रदर्शित होणार असल्याचे समजते.

“भैय्याजी सुपरहिट’मध्ये सनी देओल, अमिषा पटेल सोबत प्रीती झिंटा, अर्षद वारसी आणि श्रेयस तळपदे हे इतरही नावाजलेले कलाकार दिसणार आहेत. प्रिती झिंटा तिच्या विवाहानंतर प्रथमच या चित्रपटामध्ये दिसणार आहे. या चित्रपटामध्ये प्रीती झिंटाची भूमिका नक्की काय आहे हे अजून स्पष्ट झाले नसले, तरी प्रीती दीर्घ काळानंतर चित्रपटामध्ये पुनरागमन करीत असल्याने तिच्या ‘कम बॅक’ बद्दल तिच्या चाहत्यांच्या मनामध्ये कुतुहल आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

“भैय्याजी सुपरहिट’ एक ‘ऍक्‍शन कॉमेडी’ असून त्यात सनी देओल दुहेरी भूमिकेमध्ये दिसणार आहेत. या चित्रपटाची कथा उत्तरप्रदेश आणि बिहारमधील जीवनशैलीवर आधारित आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)