पुन्हा वेबफिल्म नाही – कियारा

‘एम. एस. धोनी-द अनटोल्ड स्टोरी’, ‘फगली’ व तेलुगूतील सुपरस्टार महेशबाबूचा ‘भरत अने नेनू’ या चित्रपटात झळकलेली अभिनेत्री कियारा अडवाणी अलीकडे ‘लस्ट स्टोरिज’ या वेब फिल्ममध्ये दिसली. नेटफ्लिक्‍सवर रिलीज झालेला ‘लस्ट स्टोरिज’ हा चित्रपट प्रचंड गाजला. या चित्रपटातील कियाराच्या भूमिकेचीही प्रचंड चर्चा झाली. यात कियाराने अश्‍लिल दृश्‍य दिले होते. त्या दृश्‍याने खळबळ उडवून दिली होती.

आधी अभिनेत्री स्वरा भास्करचा ‘वीरे दी वेडिंग’ या चित्रपटातील सीन वादाच्या भोवऱ्यात सापडला होता. तो वाद शमत नाही, तोच ‘लस्ट स्टोरीज’मधील कियारा अडवाणीच्या त्या दृश्‍याने खळबळ उडवून दिली होती. या दृश्‍यावेळी ‘कभी खुशी कभी गम’ हे गाणे वापरण्यात आल्याने मंगेशकर कुटुंबीयांच्या भावना दुखावल्याचीही बातमी आली होती. या दृश्‍यामुळे कियाराची बरीच चर्चा झाली होती. या डिजिटल प्लॅटफॉर्मने कियाराच्या करिअरला गती दिली. पण कियाराचे खरे मानाल तर या वेबफिल्ममध्ये काम करण्याची कियाराला अजिबात इच्छा नव्हती.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

करण जोहर या वेबफिल्मचा निर्माता आहे, केवळ आणि केवळ या एकाच कारणाने तिने ही वेबफिल्म स्वीकारली. पण यामुळे वेबफिल्म वा वेबसीरिजमध्ये काम करणार नाही, हे कियाराने ठरवून टाकले आहे. मला कधीच डिजिटल प्लॅटफॉर्मवर काम करायचे नव्हते. मला चांगल्या बॉलिवूड प्रोजेक्‍टची प्रतीक्षा होती. केवळ करणमुळे मी ‘लस्ट स्टोरिज’ केला. पण आता यानंतर मी कुठलीही वेबसीरिज वा वेबफिल्म करणार नाही, असे कियारा म्हणाली. डिजीटल प्लॅटफॉर्मवर कोणतेच निर्बंध लागू होत नसल्याने त्यात तारतम्य बाळगले जात नाही. अर्थात त्यामुळे अभिनयाचे निकषच पाळले जात नाहीत, असे तिला वाटते.

लवकरच कियारा ‘गुड न्यूज’मध्ये करिना कपूरसोबत दिसणार आहे. या चित्रपटात अक्षय कुमार लीड रोलमध्ये आहे. याशिवाय ‘कलंक’ या चित्रपटात कियारा छोटा रोल करताना दिसेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)