सुपरहिट ठरलेल्या “विकी डोनर’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यू करणारे आयुष्मान खुराना आणि यामी गौतम ही जोडी पुन्हा एकदा सिल्वर स्क्रीनवर येत आहे. ही जोडी दिनेश विजान यांच्या आगामी “बला’ चित्रपटात काम करणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन “स्री’चे डायरेक्टर अमर कौशिक करणार आहे.
हा चित्रपट आयुष्मान आणि यामी यांच्यासाठीही खास आहे. कारण या दोघांनी शूजित सरकार यांच्या दिग्दर्शनाखालील “विकी डोनर’ चित्रपटातून हिंदी चित्रपटसृष्टीत पर्दापण केले होते. “बला’ हा चित्रपट एका असा व्यक्तीवर आधारित आहे, ज्याला कमी वयातच अकाली टक्कलपणाला सामोरे जावे लागते. यात यामी गौतम आणि आयुष्मान यांच्यातील लव इंट्रेस्ट दाखविण्यात येणार आहे.
दरम्यान, दिनेश विजान यांनी यापूर्वी “बदलापुर’मध्ये यामीसोबत काम केलेले आहे. त्यामुळे तिच्यासोबत पुन्हा काम करण्यासाठी ते खूपच उत्सुक आहेत. यामीलाही या चित्रपटाची स्क्रिप्ट आणि कथा आवडली आहे. या चित्रपटाचे शुटिंग याच आठवड्यात सुरू करण्यात येणार असल्याची शक्यता आहे.