पुन्हा आयपीओला चांगले दिवस येणार?

36 पेक्षा अधिक कंपन्या 350 अब्ज रुपयांचे भांडवल उभारणार 
मुंबई – येत्या काही महिन्यांत 36 पेक्षा अधिक कंपन्यांकडून प्राथमिक समभाग विक्री होणार आहे. या माध्यमातून देशातील कंपन्या 350 अब्ज रुपयांपेक्षा अधिक रक्कम भांडवली बाजारातून उभारतील. प्रकल्प विस्तारण्यासाठी भांडवल उभारणे आणि खेळत्या भांडवलाची गरज असल्याने कंपन्यांकडून भागविक्री करण्यात येईल, असे सेबीच्या माहितीनुसार समजते.

सार्वजनिक उपक्रम क्षेत्रातील सहा कंपन्या लवकरच सूचीबद्ध होतील. यामध्ये इंडियन रिन्यूएबल एनर्जी डेव्हलपमेन्ट एजन्सी, रेल विकास निगम, इरकॉन इन्टरनॅशनल, राइट्‌स, गार्डन रीच शिपबिल्डर्स ऍण्ड इंजिनिअर्स, माझगाव डॉक या कंपन्यांचा समावेश आहे. सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्या सूचीबद्ध करत भांडवल उभारणीचा सरकारचा उद्देश आहे. भांडवली बाजारात सूचीबद्ध झाल्याने बॅन्ड अधिक वाढण्यास, सध्याच्या समभागधारकांमध्ये तरलता येण्यास मदत होईल, असे काही कंपन्यांना वाटते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

चालू वर्षात बार्बक्‍यू नेशन हॉस्पिटॅलिटी, टीसीएनएस क्‍लोथिंग कंपनी, नजारा टेक्‍नोलॉजीस, देवी सीफूड्‌स या कंपन्यांना सेबीकडून हिरवा कंदील देण्यात आला. याव्यतिरिक्त रुट मोबाईल, क्रेडिटअक्‍सेस ग्रामीण, सेम्बकॉर्प एनर्जी इंडिया, फ्लेमिंगो ट्रव्हल्स रिटेल, लोधा डेव्हलपर्स अशा 24 कंपन्या मंजुरीची वाट पाहत आहेत. या सर्व कंपन्या बाजारातून 35 हजार कोटी रुपये उभारतील असे व्यापारी बॅंकिंग सूत्रांनी सांगितले.

2018 मध्ये 15 कंपन्यांचे आयपीओ आले असून केवळ 20 टक्के कंपन्यांना चांगला प्रतिसाद मिळाला. गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा जास्त रिटर्न मिळण्याची शक्‍यता अल्प आहे. अपोलो मायक्रो सिस्टम्स्‌ 74 टक्के आणि अंबर एन्टरप्रायजेसचा समभाग 37 टक्‍क्‍यांनी वधारला. बऱ्याच कंपन्यांना विस्तारीकरणासाठी भांडवलाची गरज आहे. आयपीओच्या माध्यमातून त्यातील काही भांडवल जमविण्याचा या कंपन्याचा प्रयत्न असल्याचे दिसून येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)