पुण्यात 79 टक्‍के मुलांचे हेपेटायटिस लसीकरण

पुणे – राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण चारनुसार शहरातील 2 वर्षांपेक्षा कमी वयाच्या 79 टक्‍के मुलांचे हेपेटायटिस बी लसीकरण झाले आहे. महाराष्ट्रात 60.80 टक्‍के लसीकरण झाले आहे. अन्य जिल्ह्याच्या तुनलेत पुणे लसीकरणाबाबत आघाडीवर असल्याचे दिसत आहे.

आजचा दिवस (28 जुलै) हा हेपेटायटिस आजाराशी प्रतिबंध करणारा दिवस म्हणून पाळला जातो. हेपटायटीस बी हा एक विषाणूजन्य संसर्ग आहे. अगदी नवजात शिशू देखील रोगाच्या प्रसारणास बळी पडतात. रोगाचा फैलाव होण्याआधीच मुलांना लसीकरण करणे हे महत्वाचे पाऊल आहे. हिपॅटायटीस बी लसीकरण न केल्यामुळे मुलांना यकृतासंबंधी रोगास बळी पडण्याच भिती असते. हेपटायटीस बी लसीकरणाचे चार डोस मुलांना दिले जातात. जन्मापासून सहा महिन्यांत हे डोस पूर्ण केले पाहिजे. हेपटायटीस बी चा पहिला डोस रुग्णालयांमध्ये 24 तासांच्या आत दिला जातो. पुढील तीन डोस 6, 10 आणि 14 आठवड्यांत दिले जातात.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

“सर्वसाधारणपणे हेपेटाइटिस बी आजाराची कोणतीही लक्षणे मुलांमध्ये दिसत नाहीत. तथापि पाच वर्षांच्या किंवा त्याहून अधिक वयाच्या मुलांना व्हायरस शरीरात प्रवेश केल्याच्या 3 ते 4 महिन्यानंतर लक्षणे दिसून येतात. हिपॅटायटीस बीची सामान्य लक्षणे म्हणजे भूक कमी लागणे, ताप येणे, थकवा, सांध्यातील वेदना आणि गडद रंगीत मूत्र ही आहेत” अशी माहिती संसर्गजन्य आजाराचे तज्ज्ञ डॉ. महेश लाखे यांनी दिली. याबाबत पालकांनी जागरुक रहाणे गरजेचे असल्याचेही डॉ.लाखे यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)