पुण्यातही आता स्मार्ट स्कूल, सायन्स पार्क

पुणे – प्लेसमेकिंग साईट, सायन्स पार्क, बुकझानिया आणि स्मार्ट स्कूलचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते 9 फेब्रुवारी रोजी उद्‌घाटन होणार आहे.

वापरात नसलेल्या आणि अप्रयुक्त भूखंडांचा कायापालट करण्याचे काम पुणे स्मार्ट सिटीने हाती घेतले आहे. स्थानिक रहिवाशांसाठी थीम आधारित स्मार्ट शहरी स्थळनिर्मिती करण्यात येत आहे. कला आणि संस्कृती, कौशल्य विकास आणि इलर्निंग, नवनिर्मिती, फिटनेस इत्यादी थीम घेऊन या ठिकाणाचे सौंदर्यीकरण करण्यात येणार आहे.

मुलांमध्ये विज्ञानाची आवड निर्माण करण्यासाठी 10 हजार चौ. फुटांवर सायन्स पार्क विकसित करण्यात आले आहे. सूर्याच्या सावलीवरून वेळ दाखवणारे घड्याळ, आकाशगंगेसारखी रचना असणारे बदामी प्रेक्षागृह आणि इतर वैज्ञानिक साधने उपलब्ध करून देणार आहेत.

मुलांमध्ये खेळीमेळीच्या वातावरणात वाचनाची सवय लागावी यासाठी बुकझानिया ही थीम करण्यात आली आहे. बुकझानिया प्लेसमेकिंग साईट ही 6,500 चौ. फुट क्षेत्रफळावर विकसित केली आहे.

यामधेय्‌ पुस्तक वाचनासाठी बस आणि ग्राफिटी वॉल, पुस्तकाच्या डिझाईनचे खेळ, खुली व्यायामशाळा, बोर्ड गेम्स, कलेची अभिरूची आणि वातावरण निर्मितीसाठी सर्व वयोगटातील पेंटिंग बोर्ड्‌स, प्रकल्प स्वयंपूर्ण करण्यासाठी आणि देखभालीचा खर्च निघावा यासाठे मोबाइल ग्रंथालय आणि ई-बुक दालनही करण्यात येणार आहे.

स्मार्ट स्कूलमध्ये 7 शाळा
स्मार्ट सिटी मिशन अंतर्गत स्मार्ट स्कूल योजना राबवण्यात येणार आहे. यामध्ये सध्याच्या शाळांचे वेगवेगळ्या थीमवर आधारित प्रकल्पामध्ये रुपांतर करणे हे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. सध्या यासाठी सात शाळा निवडण्यात आल्या आहेत. पहिल्या टप्प्यात औंध येथील कटके स्कूल आणि इंदिरा गांधी मॉडेल स्कूल यांचा समावेश करण्यात आला आहे. या शाळांसाठी अनुक्रमे 84 लाख आणि 75 लाख रुपये विकसन खर्च करण्यात येणार आहे. या पैशांमधून अनुक्रमे 15 आणि 13 वर्गांचे “अपग्रेडेशन’ करण्यात येणार आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)