पुण्याचा गणेशोत्सव म्हणजे भन्नाटच

तरुणांचा उत्साही सहभाग : शिस्त, भव्यतेचे कुतूहल

पुणे – पुण्यातील गणेशोत्सव विसर्जन मिरवणूकीत तरूणाईचा उत्साह मोठ्या प्रमाणात पाहायला मिळाला. मंडळ कार्यकर्ते, ढोल-ताशा वादक, पथकातील स्वयंसेवक, सामाजिक कामात सहभागी झालेली तरूणाई तसेच प्रेक्षक म्हणून उपस्थित असलेले तरूण-तरूणी सर्वच ठिकाणी तरूणांची संख्या लक्षणीय होती. त्यामुळेच मिरवणुकीचा उत्साह द्विगुणीत झाला होता.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पारंपारिक वेशभूषेत नृत्याचा आनंद घेणारी तरूणाई, ढोल-ताशा, डीजेच्या तालावर थिरकणारी तरूणाई, विसर्जन मिरवणुकीचे क्षण कॅमेऱ्यात टिपणारी तरूणाई, सेल्फी काढण्यात गुंग असलेली तरूणाई तसेच विविध खाद्यपदार्थांवर यथेच्छ ताव मारत मिरवणुकीचा आनंद लुटणारी तरूणाई असे विविध रूप यावेळी पाहायला मिळाले. केवळ शहरातीलच नव्हे तर इतर गावांमधून, परराज्यांमधून तरूण-तरूणी या मिरवणूकीत सहभागी झाले होते. अशाच काही प्रतिक्रिया :

“पुण्याचा गणेशोत्सव म्हणजे एक वेगळा आणि अतिशय भन्नाट अनुभव असतो. पुण्यात शिक्षणासाठी आले होते, तेव्हा पहिल्यांदा ही मिरवणूक पाहिली. तेव्हापासून ही मिरवणूक इतकी आवडत आहे, की आज शिक्षण पूर्ण होऊन दोन वर्षे झाली तरी खास पुण्याची मिरवणूक पाहण्यासाठी मी आवर्जून याठिकाणी येते. माझे मित्र-मैत्रिणीदेखील यावेळी भेटतात. त्यामुळे पुण्याच्या मिरवणूक ही खूप आवडते.’
– पूजा गोरे, रत्नागिरी.


“लहानपनापासून मी पुण्यातील विसर्जन मिरवणूक पाहत आहे. दरवर्षी या मिरवणुकीत वेगळेपण, आनंद आणि उत्साह यांची अनुभूती होते. मिरवणूकीची शिस्त, त्याची भव्यता यांचे नेहमीच कुतुहल वाटते. खासकरून ढोल-ताशा वाजविणाऱ्या कलाकारांचे जेवढे कौतुक करावे, तितके कमी आहे. शिस्तबद्ध पद्धतीने आणि तितक्‍याच उत्साहाने केलेले वादन हे या मिरवणुकीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य आहे असे मला वाटते.”
– अभिजित गुरव, पुणे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)