पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर आदर्श राज्यकर्त्या

????????????????????????????????????

आ. बाळासाहेब थोरात ः संगमनेरला कॉंग्रेसच्या वतीने अभिवादन
संगमनेर – पाण्याचे महत्व जाणून अहिल्यादेवी होळकर यांनी अनेक ठिकाणी बंधाऱ्यांसह विहीरी-बारव निर्माण केल्या. पुरोगामी विचार जपत जनतेच्या विकासासाठी अनेक लोक कल्याणकारी योजना सुरु करणाऱ्या पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर ह्या आदर्श र्रा होत्या असे प्रतिपादन कॉंग्रेसनेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले आहे.यशोधन येथे तालुका कॉंग्रेसच्या वतीने पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती निमित्त अभिवादन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी आ. डॉ. सुधीर तांबे, नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे, तालुकाध्यक्ष बाबा ओहळ, थोरात कारखान्याचे संचालक इंद्रजीत थोरात, अजय फटांगरे, नवनाथ आरगडे, विश्‍वास मुर्तंडक, उपनगराध्यक्ष बाळासाहेब पवार, हौशीराम सोनवणे, के. के. थोरात आदिंसह मान्यवर उपस्थित होते.
आ. थोरात म्हणाले, सर्व राष्ट्रपुरुषांचे जीवन हे देशासाठी व समाजासाठी समर्पित आहे. त्यांच्या त्यागातून व बलिदानातून आज आपण सुखी आहे. पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी ह्या प्रजाहितदक्ष रायकर्त्या होत्या. जलसंधारणाचे खूप मोठे महत्व त्यांनी कृतीतून पुढच्या पिढीला पटवून दिले. अनेक बंधारे, विहीरी, बारव निर्माण केल्या. स्वत: शुर विरंगणा असलेल्या अहिल्या देवींनी पाणीपतच्या युध्दात दारुगोळा विभागाची जबाबदारी समर्थपणे सांभाळली. लढवय्या स्त्री, जनतेची माता ठरत त्यांनी अंधश्रद्धा, सतिची चाल अशा अनेक अनिष्ठ चालीरिती बंद केल्या.
आ. डॉ. तांबे म्हणाले, जनतेच्या हिताची काळजी करणाऱ्या त्या रायकर्त्या होत्या. शिक्षण आणि सुविधा त्यांनी निर्माण केल्या. पाण्याच्या विहीरी, बारव बांधून वृक्षतोड बंदी लागू केली. अंधश्रध्देस कडाकडून विरोध केला. गावोगावी अन्नक्षत्र सुरु केली. मंदिरे, महाव्दारे बांधली. अनेक धर्मशाळांसह विविध रस्त्यांची निर्मीती केली. विधवांच्या हक्कांसाठी कायदे केले. आयुष्यभर लोककल्याणाचे कार्यकरणाऱ्या पुण्यश्‍लोक अहिल्यादेवींचे जीवन पुढील पिढ्यांसाठी स्फुर्तीदायी ठरत असल्याचे ही ते म्हणाले.
दुर्गाताई तांबे म्हणाल्या, दुरदृष्टीची कणखर स्त्री, लढावू रणरागिणी, आदर्श माता असलेल्या पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी सर्व स्त्रिायांसाठी आदर्शवत आहे. पर्यावरणाची गरज ओळखून त्यांनी 17 व्या शतकात वृक्षतोड बंदी केली होती. जिल्हाची कन्या असलेल्या पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी यांचे जीवन कार्य भारतीय इतिहासात सोनेरी पान असल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढले. यावेळी शिवाजी गोसावी, ढोले गुरुजी, विलास कवडे, जगन्नाथ आव्हाड, ज्ञानेश्‍वर राक्षे, ऍड. अशोक हजारे, तात्याराम कुटे, एस.एम. खेमनर, चांगदेव खेमनर, भास्कर खेमनर, विजय राहणे, गणेश मादास, महेश वाकचौरे आदिंसह युवक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने हजर होते. प्रास्ताविक बाबा ओहळ यांनी केले. सुत्रसंचलन नामदेव कहांडळ यांनी केले. शहराध्यक्ष विश्‍वासराव मुर्तंडक यांनी आभार मानले.

 

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)