पुणे स्टेशनवर आता कमांडोंचा खडा पहारा

महिला सुरक्षेसाठी विशेष प्रयत्न : प्रवाशांना मिळणार शिस्तीचे धडे

पुणे – पुणे रेल्वे स्टेशन येथे कमांडोचा पहारा राहणार आहे. विशेषत: महिलांच्या सुरक्षेसाठी कमांडो स्टेशन परिसरात गस्त घालणार आहेत. गुरूवारपासून (दि. 26 जुलै) येथे कमांडो तैनात करण्यात आले आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

रेल्वे स्थानकावर सुरक्षा बलाचा 24 तास खडा पहारा असतोच. त्या जोडीला आता कमांडो गस्त घालणार आहेत. 26/11 रोजी मुंबई येथे अतिरेकी हल्ला झाला होता. त्यावेळी रेल्वे सुरक्षा बलाने कमांडोंचे पथक तयार केले आहे. यातील कमांडो मुंबई येथेही पहारा देतात. त्यापैकी काही जण पुण्यात आले आहेत. ते गस्त घालणार असल्याची माहिती रेल्वे सुरक्षा दलाचे निरीक्षक सुहास कांबळे यांनी दिली. रेल्वे स्टेशनवर अनेक घटना घडत असतात. चोरी, जबरी चोरी किंवा अन्य कोणत्याही घटनांमध्ये विशेष करून महिलांनाच टार्गेट केले जाते. त्यामुळे महिलांच्या सुरक्षेची हे कमांडो काळजी घेणार आहेत. याबरोबरच चोरी, लुटमार आणि अन्य घटना घडत असतात. या पार्श्‍वभूमीवर कमांडोची सुरक्षा महत्त्वाची ठरणार आहे. पार्किंगमध्ये वाहने लावताना शिस्त पाळली जात नाही. काही वेळा स्थानिक लोक अरेरावी करतात. टॅक्‍सींसाठी रेल्वेने एक स्वतंत्र लेन दिली आहे. तेथेही अनधिक़ृतपणे दुसरी वाहने घुसतात. अशा घटना घडू नये, यासाठी हे कमांडो लक्ष ठेवणार आहेत.

महिलांच्या सुरक्षेसाठी टोल फ्री क्रमांक 182
पुणे रेल्वे स्टेशनच्या आवारात महिलांना येणाऱ्या अडचणी, तक्रारी करण्यासाठी 182 हा टोल क्रमांक आहे. यावर महिला आपल्या तक्रारी करू शकतात. ज्याची दखल घेऊन रेल्वे पोलीस तक्रारी सोडविण्यास तत्पर असतात. यावर दररोज सुमारे 50 ते 60 फोन येतात. मात्र, त्यातील केवळ 20 ते 25 तक्रारी योग्य असतात. उर्वरित तक्रारी या अनाठायी असतात. यात पंखा बंद आहे, पाणी नाही, रेल्वे कोणत्या फ्लॅटफॉर्मवर लागणार आहे, ती रेल्वे गेली का, अशा आशयाच्या तक्रारी असतात. मात्र, त्यावर महिलांनी येणाऱ्या अडचणी, होणाऱ्या त्रासासंबंधी तक्रारी करणे अपेक्षित आहे. अशाच तक्रारी महिलांनी 182 या क्रमांकावर कराव्यात, असे आवाहन रेल्वे सुरक्षा बलाने केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)