पुणे – सातारा रस्त्यासाठी भाजपला घरचा आहेर

नगरसेवकाचे स्थायी समितीच्या दालनाबाहेर ठिय्या आंदोलन

पुणे – सातारा रस्त्यावरील रखडलेल्या बीआरटी कामासाठी आणि एकूणच रस्त्याच्या संथगतीने चालेल्या कामाला कंटाळून अखेर सत्ताधारी भाजपमधील नगरसेवक राजेंद्र शिळीमकर यांनी मंगळवारी स्थायी समितीच्या सभागृहाबाहेर ठिय्या आंदोलन केले.

“स्वारगेट ते कात्रज बीआरटी मार्गाचे मृत्यु थांबणार कधी?’, “स्वारगेट ते कात्रज बीआरटी मार्गाचे मृत्यु तांडव थांबणार कधी?’ आणि “आयुक्तसाहेब या कामाची चौकशी होणार कधी?’ असे फ्लेक्‍स स्थायी समितीची बैठक सुरू असताना समितीच्या सभागृहाबाहेर शिळीमकर यांनी लावले. तसेच त्याच्या दरवाज्याला प्रतिकात्मक कुलुपही लावले. हे बीआरटीचे काम गेल्या अनेक दिवसांपासून रखडले आहे. त्या प्रकरणात ठेकेदार बदलला तरी हे काम पूर्ण झाले नसल्याचे, शिळीमकर यांचे म्हणणे होते. अखेर दि.30 मे रोजी या कामाची पाहणी करू, असे आश्‍वासन स्वत: आयुक्तांनी जागेवर येऊन शिळीमकर यांना दिले. त्यानंतर ते समितीच्या बैठकीला उपस्थित राहिले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here