पुणे, सातारा, नगरसह 654 ग्रामपंचायतींच्या निवडणूका जाहीर

सरपंचांचीही होणार थेट निवडणूक


27 मे रोजी मतदान, 28 मे रोजी मतमोजणी


4,771 रिक्तपदांसाठीही होणार पोटनिवडणूका

मुंबई – पुणे (90), सातारा (23), अहमदनगरसह (77), राज्यातील विविध 25 जिल्ह्यांतील 654 ग्रामपंचायतींसाठी राज्य निवडणूक आयोगाने सार्वत्रिक निवडणूका जाहीर केल्या आहेत. या निवडणूकांबरोबर 33 जिल्ह्यांतील सुमारे 2 हजार 812 ग्रामपंचायतींमधील 4 हजार 771 रिक्तपदांसाठी पोटनिवडणुका घेतल्या जाणार आहे. या सार्वत्रिक आणि पोटनिवडणूकीसाठी 27 मे 2018 रोजी मतदान होणार असून 28 मे रोजी मतमोजणी होऊन निकाल घोषित केला जाणार आहे.
ग्रामपंचायत सदस्यांच्या निवडणूकीबरोबरच सरपंचपदाच्या थेट निवडणुकाही एकाचवेळी घेतल्या जाणार आहेत. ग्रामपंचायतींच्या या निवडणुकांसाठी 7 ते 12 मे 2018 या कालावधीत नामनिर्देशनपत्रे स्वीकारले जातील. त्यांची छाननी 14 मे रोजी होईल. नामनिर्देशनपत्रे 16 मे पर्यंत मागे घेता येतील व त्याच दिवशी चिन्ह वाटप होईल. 27 मे रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत मतदान होणर असून गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यातील ग्रामपंचायतींसाठी मात्र सकाळी 7.30 ते दुपारी 3 पर्यंतच मतदानाची वेळ असेल. मतमोजणी 28 मे रोजी होणार आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयोगाने दिली.

सार्वत्रिक निवडणूक होणाऱ्या
ग्रामपंचायतींची जिल्हानिहाय संख्या:

ठाणे- 5, पालघर- 3, रायगड- 187, सिंधुदुर्ग- 2, नाशिक- 20, धुळे- 7, जळगाव- 8, अहमदगनर- 77, पुणे- 90, सोलापूर- 3, सातारा- 23, सांगली- 82, कोल्हापूर- 74, औरंगाबाद- 4, बीड- 2, नांदेड- 7, परभणी- 1, उस्मानाबाद- 3, लातूर- 5, अकोला- 2, यवतमाळ- 29, वर्धा- 14, भंडारा- 4 आणि गडचिरोली- 2. एकूण- 654.

पोटनिवडणूक होणाऱ्या जिल्हानिहाय
संख्या (कंसात ग्रामपंचायतींची संख्या):

ठाणे (90)- 167, पालघर (73)- 144, रायगड (93)- 158, रत्नगिरी (202)- 299, सिंधुदुर्ग (74)- 104, नाशिक (200)- 318, धुळे (34)- 49, जळगाव (57)- 96, नंदुरबार (32)- 36, अहमदगनर (78)- 124, पुणे (258)- 456, सोलापूर (93)- 154, सातारा (409)- 777, सांगली (40)- 81, कोल्हापूर (87)- 126, औरंगाबाद (34)- 41, बीड (24)- 35, नांदेड (106)- 177, परभणी (28)- 40, उस्मानाबाद (48)- 65, जालना (21)- 28, लातूर (79)- 94, हिंगोली (41)- 55, अमरावती (80)- 121, अकोला (23)- 31, यवतमाळ (110)- 167, वाशीम (20)- 23, बुलडाणा (39)- 72, वर्धा (49)- 72, चंद्रपूर (74)- 106, भंडारा (6)- 48, गोंदिया (35)- 43 आणि गडचिरोली (175)- 464. एकूण (2,812)- 4,771.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)