पुणे – संशोधक विद्यार्थ्यांचे विद्यावेतन पुन्हा बंद

दोन दिवसांत निर्णय न झाल्यास धरणे आंदोलनाचा इशारा

पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील पीएच.डी. व एम.फिल. करणाऱ्या संशोधक विद्यार्थ्यांचे विद्यावेतन पुन्हा बंद करण्यात आले आहे. शैक्षणिक वर्ष 2017-18 मध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे विद्यावेतन अद्याप सुरू न करण्यात आल्याने संशोधक विद्यार्थी त्रस्त झाले आहेत. दोन दिवसांत निर्णय न झाल्यास 8 फेब्रुवारीपासून मुख्य इमारतीसमोर धरणे आंदोलन करण्याचा इशारा विद्यार्थ्यांनी दिला आहे.

विद्यापीठात पीएच.डी. करणाऱ्या विद्यार्थ्यांना महिना 8 हजार, तर एम.फिल. विद्यार्थ्यांना 5 हजार रुपये विद्यावेतन दिले जाते. कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी एप्रिल 2018 पासून हे विद्यावेतन बंद करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर विद्यार्थ्यांनी आंदोलन उभारल्यानंतर अखेर विद्यापीठ प्रशासनाने संशोधक विद्यार्थ्यांचे विद्यावेतन पूर्ववत सुरू केले होते. मात्र, 2017-18 या वर्षात नव्याने पीएच.डी. व एम.फिल. करिता प्रवेशित विद्यार्थ्यांना विद्यावेतन देण्यात आलेले नाही. यापार्श्वभूमीवर मंगळवारी संशोधक विद्यार्थ्यांकडून कुलगुरूंना शेवटचे निवेदन देण्यात आले आहे. या निवेदनात निर्णय न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)