पुणे – शाब्दिकपेक्षा सद्‌भावनेच्या राष्ट्रवादाची गरज : जावेद अख्तर

पुणे – शाब्दिक राष्ट्रवादापेक्षा आज आपल्याला सद्‌भावनेच्या राष्ट्रवादाची गरज आहे. दुर्दैवाने असे घडताना दिसत नाही. राष्ट्रवादाच्या घोषणा देण्यापेक्षा खरी देशभक्‍ती, देशप्रेम महत्त्वाचे आहे, पण आपण ते विसरत आहोत, असे ज्येष्ठ गीतकार जावेद अख्तर विद्यार्थ्यांशी संवाद साधताना म्हणाले.

ते सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय अभिमत विद्यापीठातर्फे आयोजित केलेल्या “फेस्टिव्हल ऑफ थिंकर्स’ या कार्यक्रमात बोलत होते. यावेळी सिम्बायोसिस संस्थेच्या प्रधान संचालक डॉ. विद्या येरवडेकर उपस्थित होत्या.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

आपण सामाजिक समरसता मागे टाकली आणि सामाजिक बांधिलकीही विसरत गेलो आहोत. “राष्ट्रवादी कोण आणि राष्ट्रद्रोही कोण’ यातच लोकांना जुंपवण्यात आपण गुंतलो आहोत. हा आमचा देश, हा भेदभाव काय कामाचा? राष्ट्रवाद ही घोषणा नव्हे, तर ती जगण्याची रित आहे. त्यात देशाप्रती कर्तव्य अपेक्षित आहे. विनाकारण गर्वाने मिरवण्यात राष्ट्रवाद नाही. दुर्दैवाने आम्हाला अद्याप राष्ट्रवाद या शब्दाचा खरा अर्थ उमगलेला नाही, असे अख्तर म्हणाले.

“मी’च्या मागे धावण्यात आम्ही आज “आपण’ ही संकल्पना विसरून गेलो आहोत. आज “आपण’ किंवा “आम्ही’ हे शब्द फक्‍त तिरस्कार आणि विषवल्ली पसरवताना आठवतात. आम्ही घोळके घेऊन फिरतो, पण ते स्वच्छतेचे आणि सद्‌भावनेचे नव्हे, तर लोकांना मारण्याचे. या तिरस्कार पसरवण्याला राष्ट्रवाद म्हणायचे का?, असा सवालही अख्तर यांनी केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)