पुणे – व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे 105 दावे निकाली

कौटुंबीक न्यायालय : 11 महिन्यांतील आकडेवारी


पक्षकारांचा वेळ, पैशांची होतेय बचत

पुणे – कौटुंबीक न्यायालयात प्रगत तंत्रज्ञानाचा वापर वाढला आहे. व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे देश आणि परदेशातील संवाद साधुन मार्च 2018 ते जानेवारी 2019 या कालावधीमध्ये तब्बल 105 दावे निकाली काढण्यात आले आहेत. त्यामुळे पक्षकारांचा वेळ, पैसा वाचत आहे. होणाऱ्या मानसिक त्रासातून सुटका होत आहे.

सध्याच्या काळात बदलती जीवनशैली, समजूदारपणाचा अभाव, विभक्त कुटुंब पद्धती, करिअरला देण्यात येणारे प्राधान्य, एकमेकांमध्ये सुरू असलेली रस्सीखेच, एकमेकांना वेळ न देणे, एकमेकांमध्ये होणाऱ्या संभाषणाच्या अभावामुळे पती-पत्नीतील वाद वाढले आहेत. स्वयंपाक न करणे, आवडता ड्रेस न घालणे अशा किरकोळ कारणावरून दाम्पत्यात वाद होत आहेत. पूर्वीकाळी एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये असे वाद थोरा-मोठ्यांच्या मार्गदर्शनामध्ये मिटवले जायचे. मात्र, आता विभक्त कुटुंब पद्धतीमुळे पती-पत्नीतील वाद हा थेट कौटुंबिक न्यायालयात पोहोचत आहेत. कित्येकदा खटला दाखल केल्यानंतर वादी अथवा प्रतिवादी बाहेरगावी अगदी परदेशात असण्याची शक्‍यता असते. नोकरीतून न मिळणारी सुट्टी, वेळेचा अभावामुळे ते प्रत्येक वेळी दिलेल्या तारखेस हजर राहू शकत नाहीत. त्यामुळे असे खटले लांबतात. या पार्श्‍वभूमीवर राज्य सरकारने येथील कौटुंबीक न्यायालयात व्हिडिओ कॉन्फरसिंगची सोय निर्माण केली आहे. त्याद्वारे परदेशात असलेल्या व्यक्तीच्या मोबाइलवर थेट संवाद साधता येतो. असलेल्या ठिकाणी, खोलीत बसून पक्षकार न्यायाधीश, समुपदेशकांशी संवाद साधताना दिसून येतो. काही खटल्यात तर वेगवेगळ्या देशात असलेल्या पती-पत्नीशी संवाद साधण्यात आला. अकरा महिन्यात अशा प्रकारे 105 दावे निकाली काढण्यात आल्याची माहिती दी फॅमिली कोर्ट लॉयर्स असोसिएशनच्या अध्यक्ष अॅड. वैशाली चांदणे यांनी दिली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)