पुणे: वीजवाहिन्या तोडल्याप्रकरणी 21 कंत्राटदारांविरुध्द गुन्हे

पर्वती जलशुद्धीकरण केंद्राला फटका

सोमवारी पर्वती जलशुद्धीकरण केंद्राला वीजपुरवठा करणाऱ्या दोन भूमिगत वीजवाहिन्या महानगरपालिकेच्या पाइपलाइनसाठी सुरू असलेल्या जेसीबीच्या खोदकामात तोडल्यामुळे या केंद्राचा वीजपुरवठा खंडित झाला होता. मध्यरात्री या दोन्ही वीजवाहिन्यांची दुरुस्ती करण्यात आली असून जलशुद्धीकरण केंद्राचा वीजपुरवठा पूर्ववत करण्यात आला आहे.

महावितरणला लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान

पुणे- मागील वर्षभरामध्ये पुणे व पिंपरी-चिंचवड शहरातील विविध कामांसाठी जेसीबी किंवा इतर यंत्राद्वारे झालेल्या खोदकामात तब्बल 318 ठिकाणी महावितरणच्या भूमिगत वीजवाहिन्या तोडण्यात आलेल्या आहेत. याप्रकरणी महावितरणकडून 21 कंत्राटदारांविरुध्द गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. वीजवाहिन्या तोडल्यामुळे महावितरणला लाखो रुपयांच्या आर्थिक नुकसानीसह ग्राहकांनाही त्रास सहन करावा लागला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

शहरात विविध कामांसाठी पुणे महानगरपालिका, एमएनजीएल व इतर कंपन्यांच्या कंत्राटदारांनी जेसीबी व इतर यंत्राद्वारे केलेल्या खोदकामात 282 ठिकाणी महावितरणच्या भूमिगत वीजवाहिन्या तोडल्या गेल्या. यामध्ये सर्वाधिक पद्मावती विभागामध्ये सर्वाधिक 157 ठिकाणी असे प्रकार घडले. या विभागअंतर्गत पद्मावती, धनकवडी, मार्केटयार्ड, बिबवेवाडी, कात्रज, आंबेगाव, गुलटेकडी, भवानीपेठ, गंजपेठ, सहकारनगर, बालाजीनगर आदी परिसर येतो. पुणे शहरात आतापर्यंत सहा ठिकाणी संबंधित कंत्राटदारांविरुद्ध पोलीसांनी गुन्हे नोंदविले आहेत. पिंपरी-चिंचवड शहरामध्ये गेल्या वर्षभरात 36 ठिकाणी खोदकामामध्ये भूमिगत वीजवाहिन्या तोडण्यात आल्या. यातील 15 ठिकाणच्या कंत्राटदारांविरुद्ध पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. वीजवाहिन्या तोडल्यानंतर महावितरणकडून करण्यात आलेल्या तक्रारी या अनेक पोलीस ठाण्यात अदखलपात्र म्हणून नोंदविण्यात येत असल्यामुळे पुढील कारवाई सुद्धा पोलिसांकडून होत नसल्याचे निदर्शनास आले आहे.

खोदकामासाठी परवानगी मिळविल्यानंतर संबंधीत विभाग व कंपन्यांचे कंत्राटदार महावितरणला कोणत्याही प्रकारची पूर्वमाहिती न देता थेट खोदकामास सुरूवात करीत असल्याची स्थिती अजूनही कायम आहे. दिवसा, रात्री किंवा मध्यरात्रीनंतर केव्हाही होणाऱ्या खोदकामात महावितरणच्या भूमिगत वीजवाहिन्या तोडण्यात येत असल्याची स्थिती आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)