पुणे – विशेष कारवाईतून आरटीओ मालामाल

-नियमबाह्य वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई : 31 लाखांचा दंड, कर वसूल

पुणे – विनापरवाना, विनाफिटनेस वाहन चालवणे तसेच प्रवाशांकडून मनमानी पध्दतीने भाडे आकारणाऱ्या खासगी बसेसवर प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून धडक कारवाई करण्यात आली होती. 2 मेपासून सुरू केलेल्या कारवाईत 666 खासगी बसेसची तपासणी करण्यात आली होती. त्यापैकी 186 वाहनांवर खटले दाखल करून 54 खासगी बसेस जप्त केल्या होत्या; तर 58 वाहने निकाली काढण्यात आली. त्यांच्याकडून 31 लाख रुपयांचा महसूल वसूल करण्यात आल्याची माहिती आरटीओ कार्यालयाकडून देण्यात आली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

कंत्राटी परवान्यावर नोंद असणाऱ्या खासगी बस धारकांकडून सुट्ट्यांच्या काळात प्रवाशांची लुट करण्यात येत असून मनमानी भाडे आकारले जात होते. त्याविरोधात प्रवाशांकडून अनेक तक्रारी आरटीओकडे नोंदविण्यात आल्या. या पार्श्‍वभूमिवर पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वायुवेग पथकामार्फत 2 मेपासून विशेष मोहीम राबवण्यात आली होती. त्यांतर्गत 666 बसेसची तपासणी करण्यात आली असून 186 दोषी बसेसवर खटले दाखल करण्यात आले होते. तर काही बस जप्त करण्यात आल्या होत्या. गेल्या 15 दिवसांत यापैकी निकाली काढण्यात आलेल्या 54 खासगी बस चालकांकडून 4 लाख 93 हजार 800 रुपये दंड तर 26 लाख 87 हजार 306 रुपये वाहन कर वसूल करण्यात आला आहे. एकुण 31 लाख 81 हजार 306 रुपये खासगी बसचालकांकडून वसूल करणयात आले आहेत. थकीत मोटार वाहन कर, योग्यता प्रमाणपत्र मुदतीत नसणे, विना परवाना वाहतूक करणे अशा नियमभंगांतर्गत ही कारवाई करण्यात आली होती. आरटीओने या बसेस स्वारगेट एसटी डेपो, बालेवाडी पीएमपीएमएल डेपो या ठिकाणी ठेवल्या होत्या.
—- ————

प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून खासगी बसेसवर कारवाईची विशेष मोहीम राबवण्यात आली होती. या मोहीमेत 186 खासगी बसेसवर खटले दाखल केले होते; तर 54 बस जप्त केल्या होत्या. नियमानुसार कार्यवाही करून जप्त केलेल्या 54 पैकी 44 खासगी बस सोडण्यात आल्या असून 186 पैकी 58 वाहने निकाली काढण्यात आली आहेत.
– संजय राऊत, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, आरटीओ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)