पुणे विद्यापीठात विद्यार्थी तक्रार निवारण समिती

विद्यार्थ्यांच्या गाऱ्हाणींसाठी व्यासपीठ उपलब्ध
पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये निवृत्त जिल्हा न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली विद्यार्थी तक्रार निवारण समिती स्थापन करण्यात आली. या समितीकडे आता विद्यार्थ्यांना दाद मागण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध झाले आहे. प्रवेश मिळण्यात येणाऱ्या अडचणी, परीक्षेबाबतच्या तक्रारी, रखडणारे निकाल, वेळापत्रकांची अनियमितता, यासह विविध प्रश्‍नांबाबत तक्रारी निवारण समितीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे प्रश्‍न सुटण्याची चिन्हे आहेत.

महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, 2016 कलम 79 (3) अन्वये विद्यार्थ्यांसाठी विद्यापीठ स्तरावर तक्रार निवारण समिती स्थापन करणे अनिवार्य करण्यात आले होते. नवीन विद्यापीठ कायद्याची अंमलबजावणी सुरू होऊन वर्ष उलटले तरी या समितीची स्थापना करण्यात आली नव्हती. त्यामुळे विद्यार्थ्यांना त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत होते. यापार्श्वभूमीवर विद्यापीठाने विद्यार्थी तक्रार निवारण समितीची स्थापना केली आहे.

सेवानिवृत्त जिल्हा न्यायाधीश माधव गोडबोले यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती काम करेल. आंतरविद्याशाखीय अभ्यास विभाग अधिष्ठाता डॉ. दीपक माने, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य राजेश पांडे, प्रभारी कुलसचिव डॉ. अरविंद शाळीग्राम, प्रा. देविदास वायदंडे, अध्यापकेतर कर्मचारी विवेक बुचडे, उपकुलसचिव बी. डी. उढाणे या समितीचे सदस्य राहतील. विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी निवृत्त जिल्हा न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन झाल्याने त्यांचे प्रश्न मार्गी लागणे शक्‍य होणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)