पुणे – वाढत्या गुन्हेगारीनंतर पोलिसांना जाग; झोपडपट्ट्यांत झाडाझडती

पुणे – शहरातील वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्‍वभूमीवर गुन्हे शाखेच्या पथकांनी स्थानिक पोलिसांच्या मदतीने शहरातील काशेवाडी, जनता वसाहत, दांडेकर पूल भागातील झोपडपट्ट्यांत गुरूवारी “कोम्बिंग ऑपरेशन’ राबविले. यावेळी रेकॉर्डवरील गुन्हेगारांची झाडाझडती घेण्यात आली. रात्री उशिरापर्यंत पोलिसांची ही कारवाई सुरू होती.

शहरात गुन्हेगारी वाढल्यामुळे खडबडून जागे झालेले पोलीस आयुक्त के. व्यंकटेशम यांनी गुन्हेगारांच्या मुसक्‍या आवळून त्यांच्यावर करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच गुन्हेगारांचे वास्तव्य असलेल्या वसाहतींमध्ये “कोम्बिंग ऑपरेशन’ राबविण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार गुन्हे शाखेचे पोलीस आयुक्त शिरीष सरदेशपांडे यांच्या नेतृत्वाखाली सात पथके तयार करण्यात आले आहेत. त्यामध्ये 70 अधिकारी कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. गुरूवारी दुपारी गुन्हे शाखा युनिट-1च्या पथकाने खडक पोलीस ठाण्याच्या हद्दीतील काशेवाडी मध्ये “कोम्बिंग ऑपरेशन’ राबविले तसेच रेकॉर्डवरील गुन्हेगारांची चौकशी करण्यात आली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

मागील काही दिवसांमध्ये जनता वसाहत, दांडेकर पूल हा परिसरात गुन्हेगारांनी उच्छाद मांडला आहे. त्यानुसार ही छापेमारी करण्यात आली.

त्यामुळे गुरूवारी रात्री या भागातील रेकॉर्डवरील गुन्हेगारांची तपासणी करण्यात आली. त्यांची चौकशी करण्यात येत होती. रात्री उशिरापर्यंत ही कारवाई सुरू होती. या कोम्बिंग ऑपरेशनमुळे गुन्हेगारांची एकच धावपळ उडाली. या कारवाईमध्ये किती गुन्हेगारांना ताब्यात घेण्यात आले याबाबत रात्री उशिरापर्यंत माहिती मिळू शकली नाही. गुन्हे शाखेचे उपायुक्त शिरिष सरदेशपांडे यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)