पुणे: वाचनातून बुद्धिवान लढवय्ये होण्याचा प्रयत्न करा

“सारंग’चे हवाई प्रदर्शन
पदवी प्रदान समारंभापूर्वी एनडीएचे मुख्यालय असलेल्या सुदान ब्लॉक समोरील प्रांगणात हवाई दलाच्या सारंग हेलिकॉप्टर चमूने चित्तथरारक कसरती सादर करत उपस्थितांना खिळवून ठेवले. हवेतल्या हवेत गिरकी घेणे, अगदी धडक होईल इथपर्यंत एकमेकांजवळ येऊन दूर जाणे अशा अनेक कसरती या चार हेलिकॉप्टर्सच्या टीमने सादर केली. यामध्ये वाईनग्लास, डायमंड, क्रॉस ओव्हर, हार्ट, स्पिल्ट अशा कसरतींचा समावेश होता. हिंदुस्थान एअरोनॉटिक्‍स लिमिटेडने विकसित केलेल्या “ध्रुव’ या देशी बनावटीच्या “ऍडव्हान्स लाइट हेलिकॉप्टर’च्या माध्यमातून या कसरती सादर झाल्या. अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने सारंग या हेलिकॉप्टर तुकडीने सादर केलेल्या हवाई प्रात्यक्षिकाने उपस्थितांची मने जिंकली.

सतीश दुआ : राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या 134 व्या तुकडीचा पदवी प्रदान समारोह

पुणे – सैन्य दलात शारीरिक क्षमतेसोबतच बौद्धिक क्षमतेचाही वेळोवेळी कस लागतो. तुमचा निर्णयावर तुमच्या सहकाऱ्यांचे जीवन अवलंबून असते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी शारीरिक क्षमता विकसित करण्यासोबतच, बुद्धिवान लढवय्ये होण्याचा प्रयत्न केला पाहिजे, असे मत इंटिग्रेटेड आर्मी स्टाफचे प्रमुख लेफ्टनंट जनरल सतीश दुआ यांनी व्यक्त केले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या 134 व्या तुकडीचा पदवी प्रदान समारोह मंगळवारी झाला. यावेळी दुआ यांच्या उपस्थितीत उत्तीर्ण विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली. प्रबोधिनीचे प्रमुख एअर मार्शल आय. पी. विपीन, प्राचार्य ओम प्रकाश शुक्‍ला, उप-प्रमुख रेअर ऍडमिरल एस. के. गरेवाल हे उपस्थित होते. तिन्ही दलातील रौप्य पदक विजेत्यांना लेफ्टनंट जनरल दुआ यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. प्रबोधिनीतून यंदा 333 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यामध्ये विज्ञान शाखेचे 80 विद्यार्थी, संगणक शास्त्र अभ्यासक्रमाचे 191 विद्यार्थी तर कला शाखेचे 62 विद्यार्थी आहेत. मित्रदेशांतील आठ विद्यार्थ्यांचाही यामध्ये समावेश आहे. यावेळी कमाडंट सिल्वर मेडल “चिफ ऑफ आर्मी स्टाफ’ हा पुरस्कार विज्ञान शाखेच्या नवीन रेड्डी याला, “चिफ ऑफ नेव्हल स्टाफ’ पुरस्कार संगणकशास्त्र शाखेचा सुरेन्द्र सिंग बिश्‍त याला तर “चिफ ऑफ एअर स्टाफ’ हा पुरस्कार कला शाखेचा प्रजापती मित्तल याला प्रदान करण्यात आला.

दुआ म्हणाले, ” सैन्यदलातील अधिकाऱ्यांमध्ये शौर्य असतेच, त्याचबरोबर बुद्धिमतादेखील असायला हवी. त्यासाठी वाचन हे महत्त्वाचे असते. सैन्यदलात नव्याने भरती होणाऱ्या विद्यार्थ्यांनी सैन्यात अधिकारी पदावर भरती झाल्यानंतरही विद्यार्थ्यांनी त्यांच्या बौद्धिक क्षमतेचा विकास केला पाहिजे. त्याचबरोबर आपल्या सहकाऱ्यांसाठी एक नैतिक आदर्श बनण्याचा प्रयत्न केला पाहिजे. प्रत्येक सैन्याला एक नैतिक पुढाकाराची आवश्‍यकता असते. त्यामुळे तुम्ही तुमच्यातील नैतिक मुल्यांची जपवणूक करत, इतरांसाठी आदर्श निर्माण करावा.’

एअरमार्शल आय. पी. विपीन म्हणाले, “प्रबोधिनीचा इतिहास हा सैन्य दलातील एक गौरवशाली इतिहास आहे. यातून बाहेर पडलेल्या विद्यार्थ्यांनी अनेक चांगल्या कामगिरीमध्ये स्वत:चे शौर्य सिद्ध केले आहे. आज प्रबोधिनीतून बाहेर पडणाऱ्या विद्यार्थ्यांनी या परंपरेचे पालन करावे, त्याच बरोबर स्वत:च्या सीमा विस्तारत नवीन गोष्टी शिकण्याच्या संधी अंगिकारल्या पाहिजे.’

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)