पुणे- लोणावळा दरम्यानच्या लोकलच्या चार फेऱ्या रद्द

पुणे- लोहमार्गाच्या देखभाल व दुरुस्तीच्या कामामुळे येत्या 23 ते 30 एप्रिल याकाळात पुणे-लोणावळा दरम्यानच्या लोकलच्या चार फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत तसेच पुणे-दौड दरम्यानच्या डेमू पॅसेंजरच्याही रोजच्या दोन फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत.

पुण्यावरुन लोणावळ्याला जाणारी दुपारी 12 वाजून 15 मिनिटांनी आणि दुपारी एक ची लोकल रद्द करण्यात आली आहे तसेच लोणावळ्याहून पुण्याकडे येणारी दुपारी दोन आणि साडेतीन वाजताची लोकल रद्द करण्यात आली आहे.त्याचप्रमाणे पुणे-दौंड दरम्यान लोहमार्गाच्या देखभाल दुरुस्तीच्या कामामुळे गाड्यातही बदल करण्यात आला आहे.
सकाळी साडेदहा वाजता निघणारी पुणे-दौड डेमू पॅसेंजर आणि दौडवरुन दुपारी 12 वाजून 43 मिनिटांनी पुण्याकडे येणारी डेमू रद्द करण्यात आली आहे.

बारामती-पुणे पॅसेंजर आणि पुणे-निजामाबाद पॅसेंजर,पुणे-दौड-पुणे स्थानकादरम्यान रद्द करण्यात आली आहे. अमरावती पुणे एक्‍सप्रेस मंगळवारी दौड स्थानकावर सुमारे पन्नास मिनिटे आणि रविवारी सुमारे 1 तास पन्नास मिनिटे थांबेल,हैद्राबाद-पुणे एक्‍सप्रेस सोमवार,बुधवार अिाण शनिवारी दौड स्थानकावर सुमारे दिड तास थांबविण्यात येईल असे मध्य रेल्वेच्या पुणे विभागाच्यावतीने कळविण्यात आले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)