पुणे लॉयर्स सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा रविवारी

पुणे – पुणे लॉयर्स कन्झुमर को-ऑपरेटीव्ह सोसायटीची 57 वी वार्षिक सर्वसाधारण सभा येत्या रविवारी (दि. 30 सप्टेंबर) होणार आहे. मुकुंदनगर येथील झांबरे पॅलेस येथे सकाळी 10 वाजता होणार आहे. या सभेस अधिकाधिक सभासदांनी उपस्थित राहावे, असे आवाहन सोसायटीचे अध्यक्ष ऍड. यशवंत ऊर्फ बाळासाहेब खराडे यांनी केले आहे. त्यावेळी ऍड. फैय्याज शेख, ऍड. निवेदीता काळे आणि ऍड. शिल्पा टापरे
वकील वर्गासाठी ई-चलन, ई स्टेम्प आणि इतर सर्व प्रकारचे स्टॅम्प पेपर, तिकीटे आणि वकील व्यवसायासाठी लागणारी सर्व स्टेशनरी उपलब्ध करून देणारी ही एकमेव संस्था आहे. शिवाजीनगर न्यायालयात संस्थेचे ऑफीस आहे. जिल्ह्यातील तब्बल 7 हजार वकील या संस्थेचे सभासद असून, वार्षिक 150 कोटी रुपयांहून अधिक उलाढाल आहे. संस्थेचे अधिकृत भाग भांडवल 25 लाख रुपये आहे. ही संस्था वकील वर्गाच्या हितासाठी अहोरात्र झटत असते. सभासदांना वार्षिक लॉ-डायरी आणि गिफ्ट कुपण दिले जाते. भविष्यात सर्व सभासदांना विमा कवच देण्याचा संस्थेचा मानस असल्याचे ऍड. खराडे यांनी यावेळी सांगितले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)