पुणे – रस्ते सुरक्षेसाठी सामूहिक प्रयत्नांची गरज

पोलीस आयुक्‍त : रस्ता सुरक्षा अभियानाचे उद्‌घाटन

पुणे – शहर परिसरात गतवर्षीच्या तुलनेत यावर्षीच्या जानेवारी-2019 मध्ये अपघाती मृत्युंचे प्रमाण 44 टक्‍क्‍यांनी घटले आहे. यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालय, वाहतूक पोलीस, महापालिका प्रशासन सर्वंकष प्रयत्न करत आहे. याला नागरिकांचाही प्रतिसाद मिळत आहे. येत्या काळात हे प्रमाण आणखी कमी करण्यासाठी सामूहिक प्रयत्न आवश्‍यक आहेत, असे आवाहन पोलीस आयुक्त के. वेंकटेशम यांनी व्यक्त केले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

जिल्हा रस्ता सुरक्षा समिती, परिवहन विभाग व पोलिस विभाग यांच्या विद्यमाने आयोजित “30 वे रस्ता सुरक्षा अभियान 2019′ उद्‌घाटनावेळी ते बोलत होते. याप्रसंगी महापौर मुक्‍ता टिळक, पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप पाटील, प्रादेशिक परिवहन अधिकारी बाबासाहेब आजरी, पोलीस उपायुक्त (वाहतूक ) तेजस्वी सातपुते, पिंपरी-चिंचवड पोलिस उपायुक्‍त (वाहतूक) नम्रता पाटील, महाविद्यालयाचे संचालक डॉ. बी. बी. आहुजा, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय राऊत, विनोद सगरे, आनंद पाटील आदी उपस्थित होते. रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत पुढील सात दिवसांत जिल्ह्यातील विविध भागांत कार्यक्रम घेण्यात येणार आहेत.

वेंकटेशम म्हणाले, “शहर परिसरात अपघाती मृत्युचे प्रमाण चिंताजनक असून हे रोखण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. अपघाती मृत्युमध्ये पादचाऱ्यांचे प्रमाण जास्त असून यापुढील काळात पादचाऱ्यांच्या सुरक्षेला प्राधान्य देण्यात येणार आहे.’
आजरी म्हणाले, “गेल्यावर्षी शहरामध्ये रस्ते अपघातांत 1 हजार 361 लोकांचा मृत्यू झाला आहे. हे प्रमाण कमी करण्यासाठी नागरिकांनी वाहतुकीच्या नियमाचे पालन करण्याची गरज आहे.’

रस्ते अपघात रोखण्यासाठी महापालिका प्रशासन वाहतूक पोलीस, आरटीओ तसेच स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने प्रयत्न करण्यात येत आहेत. आरटीओकडून वाहन परवाना देताना घेण्यात येणाऱ्या टेस्टची कडक अंमलबजावणी करणे गरजेचे आहे.
– मुक्‍ता टिळक, महापौर.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)