पुणे – रत्नागिरी हापूसच्या एका पेटीला 5001 भाव

पुणे – मार्केट यार्डातील फळ विभागात सुरू असलेली रत्नागिरी हापूस आंब्याची हंगामपूर्व आवक सुरूच आहे. बाजारात आवक झालेल्या 5 डझनच्या एका पेटीला 5001 रुपये भाव मिळाला. फेब्रुवारीपर्यंत ही हंगामपूर्व आवक होत राहणार आहे. हवामानाने साथ दिल्यास फेब्रुवारी अखेर किंवा मार्च महिन्याच्या सुरुवातीला आवक सुरळीत होईल, असा अदाजही व्यापारी वर्तवित आहेत.

रत्नागिरी येथील अलीमवाडी पेठ किल्ला येथील शेतकरी भुषण नथुराम जाधव यांच्या बागेतून आडते करण जाधव यांच्या गाळ्यावर रत्नागिरी हापूस आंब्याच्या 5 डझनाची 1 पेटीची आवक झाली. खरेदीदार, रावसाहेब कुंजीर यांनी 5001 रुपयांना या पेटीची खरेदी केली. बाजारात इतर आडत्यांकडे आठवड्यातून 5 ते 6 पेटी रत्नागिरी हापूसची आवक होत आहे. दर्जा आणि आकारानुसार त्यास भाव मिळत आहे.

दरवर्षी जानेवारी महिन्यात रत्नागिरी हापूस दाखल होत असतो. यंदा मात्र दोन महिने आगोदरच हंगामपुर्व रत्नागिरी हापूसची आवक सुरू झाली आहे. यंदा पोषक हवामानामुळे आंब्याचे उत्पादन वाढणार असून यंदा फेब्रुवारी अखेर किंवा मार्च महिन्यापासून हापूसची सुरळीत सुरू होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे हंगामाच्या सुरुवातील आंब्याला चांगले भाव मिळतील त्यानंतर आवक वाढून आंब्याचे भाव आवाक्‍यात येतील, असा अंदाजही त्यांनी व्यक्त केला.

– करण जाधव, आडते

Leave A Reply

Your email address will not be published.