पुणे: मौजमजेसाठी वाहने चोरणारा अल्पवयीन जाळ्यात

दोन महागड्या सायकली व एक दुचाकी जप्त
तक्रारी वाढल्यानंतर अलंकार पोलिसांची कारवाई

पुणे -पॉकेटमनीसाठी महागड्या सायकली व बाईक चोरणाऱ्या एका अल्पवयीन मुलास अलंकार पोलिसांनी अटक केली. त्याच्या ताब्यातून दोन महागड्या सायकली व एक दुचाकी हस्तगत करण्यात आली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

अलंकार पोलीस ठाण्याच्या हद्दीतून मागील काही महिन्यात महागड्या सायकली चोरी जाण्याच्या तक्रारी वाढत होत्या. पोलिसांनी याकडे लक्ष देत एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले. त्याने गिअर असलेल्या महागडया सायकली चोरल्याची कबुली दिली. त्याने चोरलेली एक सायकल मित्राला विकली होती. तर चोरलेली दुचाकी तो स्वत:साठी वापरत होता. त्याच्याकडून चोरीच्या दोन गिअरच्या सायकली व एक बाइक असा 70 हजाराचा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे. चौकशीदरम्यान त्याने पॉकेटमनी तसेच ऐषोरामासाठी चोरी केल्याचे कबूल केले आहे.

ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक रेखा साळुंखे, पोलीस निरीक्षक विजयकुमार शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अंबरिष देशमुख ,गणेश माने, राजेंद्र सोनवणे, प्रमोद मोहिते, नवनाथ शिंदे, नितीन पडवळ, जावेद शेख, दशरथ कर्णे यांच्या पथकाने केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)