पुणे – मोदी सरकार खोट्या नोटेसारखेच!

बाळासाहेब शिवरकर : वानवडीत कॉंग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक

हडपसर – मोदींच्या नेतृत्वाखाली सरकारने शौचालयाच्या योजनेसह कॉंग्रेसच्या साऱ्या योजनांची नक्कल करून त्या योजना स्वतःच्या नावावर खपवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांचा हा प्रकार पाहिल्यानंतर मोदी सरकार म्हणजे एका खोट्या नोटेसारखे आहे. ही खोटी नोट फेकून देऊन आता कॉंग्रेसचीच खरी नोट आपण हातात धरली पाहिजे, असे प्रतिपादन कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर यांनी केले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

वानवडी येथे आयोजित करण्यात आलेल्या कॉंग्रेस कार्यकर्त्यांच्या बैठकीत शिवरकर बोलत होते. बूथ पातळीवरील पक्षाची बांधणी आणि शक्‍ती ऍपमार्फत पक्ष मजबुतीचे प्रयत्न या अनुषंगाने ही बैठक जांभुळकर गार्डन येथे आयोजित करण्यात आली होती. यावेळी हडपसर ब्लॉक कॉंग्रेसचे अध्यक्ष प्रशांत तुपे, महिला अध्यक्षा माजी नगरसेविका विजया वाडकर, कविता शिवरकर, पार्वती भडके, माजी नगरसेवक अभिजीत शिवरकर, युवक अध्यक्ष अमित घुले, विजय जाधव, चंद्रकांत मगर, गणेश फुलारे, सुनील गायकवाड, तसेच कॉंग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मोदी सरकार आणि फडणवीस सरकारवर सडकून टीका करताना शिवरकर म्हणाले की, खोटी स्वप्ने दाखवून सत्तेत आलेल्या या सरकारला आता धडा शिकवला पाहिजे आणि ती वेळ आली आहे. सरकारी अनुदानातून शौचालय बांधण्याची संकल्पना सगळ्यात पहिल्यांदा आमच्या मतदारसंघात वानवडीत सुरू झाली. त्यानंतर या योजनेची साऱ्या राज्यात अंमलबजावणी करण्याचा आग्रह आपण तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्याकडे धरला. त्यांना ही योजना पसंत पडली. नंतर राज्यात हगणदारीमुक्त महाराष्ट्राच्या माध्यमातून शौचालय योजना सुरू झाली. आता त्याच योजनेचे मोदींनी केंद्रात अनुकरण करून ही आपणच ही योजना सुरू केली, असे भासवले आहे. मोदींनी कॉंग्रेसच्याच काळात सुरू झालेल्या सगळ्या जुन्या योजनांची अशी नक्कल केली आहे. हे नक्कल करणारे सरकार आता आपल्याला फेकून देऊन कॉंग्रेसचे अस्सल सत्तेवर आणावे लागेल, असेही शिवरकर म्हणाले.

कॉंग्रेसने कसदार उमेदवार द्यावा
पुणे शहर लोकसभा मतदारसंघात कॉंग्रेसने कसदार व निष्ठावंत उमेदवार द्यावा, अशी मागणी बाळासाहेब शिवरकर यांच्यासह उपस्थित कार्यकर्त्यांनी यावेळी केली. आम्ही पक्षासाठी काम करणारे कार्यकर्ते आहोत. राहुल गांधी यांना पंतप्रधान करण्यासाठी आम्ही जिवाचे रान करू असही ते म्हणाले. कॉंग्रेसच्या काळात अनेक गरीब कार्यकर्त्यांना सहाय्यक पदावर काम करण्याची संधी मिळाली. त्याआधारे त्यांना लाल दिव्याच्या गाडीचा सन्मान मिळाला, पण मोदी सरकारने तर हा सन्मान कार्यकर्त्यांना मिळणारा लाल दिव्याचा सन्मानच काढून घेतला त्याबद्दल खंत व्यक्त केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)