पुणे : महापालिकेत आता ५ जण असणार प्रभारी आरोग्यप्रमुख

पुणे- महापालिका आरोग्य खात्यातील तीन आरोग्य अधिकाऱ्यांना सहयक आरोग्य अधिकारीपदी बढती करण्यात आली आहे. यापूर्वी 2 सहायक आरोग्य अधिकारी असून त्याच्याकडे रिक्त असलेल्या मुख्य आरोग्य अधिकारी पदाचा पदभार देण्यात आलेला आहे. मात्र, आता आणखी 3 अधिकारी बढतीने आल्याने या दोन अधिकाऱ्याकडील काही विभागाचे कामकाज या 3 अधिकाऱ्यांना वाटून दिले जाण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे आरोग्य प्रमुख पदाचा पदभार आता 5 सहायक आरोग्य अधिकाऱ्याकडे असणार आहे.

महापालिकेच्या महिला आणि बालकल्याण समितीने या बढतीस मान्यता दिली आहे. त्यात, डॉ. संजीव वावरे, डॉ. कल्पना बळीवंत आणि डॉ. मनीषा नाईक यांची सहाय्यक आरोग्य अधिकारी म्हणून पदोन्नती झाली आहे. यासंदर्भातील प्रस्तावाला सर्वसाधारण सभेची मंजुरी मिळाल्यानंतर पुढील कार्यवाही होईल. आरोग्य खात्यात सहाय्यक आरोग्य अधिकारी पदाच्या चार जागा रिक्त आहेत.

त्यानुसार खात्यातर्गंत तिघांना पदोन्नती देण्याचा प्रस्ताव प्रशासनाने आयत्यावेळी बालकल्याण समितीच्या बैठकीत मांडला. त्यावर चर्चा होऊन तो मंजूर केल्याचे समितीच्या अध्यक्ष राजश्री नवले यांनी सांगितले. दरम्यान, या निर्णयामुळे महापालिकेतील सहायक आरोग्य प्रमुखांची सर्व पदे भरली जाणार असली तरी अजूनही पालिकेत मुख्य आरोग्य अधिकारी आणि उप आरोग्य अधिकारी ही दोन्ही पदे रिक्त आहेत. त्यातील उपमुख्य अधिकाऱ्यांची पदे ही पदोन्नतीने भरली जाणे अपेक्षित आहे. मात्र, प्रशासनाकडून अजून त्याबाबत काहीच हालचाल करण्यात आलेली नाही.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)