पुणे: भूसंपादन केलेल्या शेतकऱ्यांना योग्य मोबदला द्या

सर्व विभागांनी समन्वयाने काम करा
आळंदी-देहू मार्गाच्या दुरुस्तीचे काम तातडीने करून घ्यावे. पालखी मार्गावरील रस्त्याच्या दुरुस्तीची कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करून घ्यावीत. तसेच पालखी तळांच्या ठिकाणी सपाटीकरण करून तात्पुरत्या स्वरुपात पुरेशा प्रमाणात शौचालये बांधण्यात यावीत. पालखी तळाच्या ठिकाणी पुरेशा पाण्याची व वीजेची सोय करण्यात यावी. वारीच्या कालावधीत वारकरी व भाविकांना आरोग्याच्या समस्या उदभवू नयेत यासाठी शुध्द पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्याच्या दृष्टीने सर्व पाण्याचे स्त्रोत तपासण्यात यावेत. तसेच आरोग्य विभागाने सर्व ठिकाणी सज्ज राहण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी यावेळी केल्या. या कालावधीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये, अपघात, दुर्घटना टाळण्यासाठी पोलीस विभागाने सतर्क राहण्याच्या सूचना ही त्यांनी दिल्या. पंढरपूर आषाढी वारी यशस्वी होण्यासाठी शासनाच्या सर्व विभागांनी समन्वयाने काम करण्याच्या सूचनाही पालकमंत्री गिरीश बापट यांनी दिल्या.

पालकमंत्री बापट : आषाढी वारी पूर्वतयारी विषयक बैठक

पुणे – पालखी मार्गाच्या विकासासाठी केंद्र सरकारने मोठ्या प्रमाणात निधी दिला आहे. त्यामुळे या कामाला गती देण्यासाठी तिन्ही जिल्ह्यातील अधिकाऱ्यांनी भूसंपादनाची कामे वेगाने करावीत. भूसंपादन करताना बाधीत शेतकऱ्यांना योग्य व तातडीने मोबदला द्यावा, अशा सूचना पालकमंत्री गिरीश बापट यांनी दिल्या.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

विधान भवनातील सभागृहात पालकमंत्री बापट यांच्या अध्यक्षतेखाली पंढरपूरच्या आषाढी वारी पूर्वतयारी विषयक बैठक झाली. यावेळी सोलापूरचे पालकमंत्री विजयकुमार देशमुख, साताऱ्याचे पालकमंत्री विजय शिवतारे, पशू संवर्धन मंत्री महादेव जानकर, सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, खासदार अनिल शिरोळे, पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्‍वासराव देवकाते, पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक, पिंपरी-चिंचवडचे महापौर नितीन काळजे, आमदार बबनराव शिंदे, प्रशांत परिचारक, विजय काळे, मकरंद पाटील, राहूल कूल, भीमराव तापकीर, आमदार माधुरी मिसाळ, विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर, पुणे मनपाचे आयुक्त सौरभ राव, पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता प्रवीण कीडे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा प्रमुख विकास ढगे-पाटील, संत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष बाळासाहेब मोरे, संत सोपानकाका महाराज पालखी सोहळा प्रमुखांसह विविध दिंड्यांचे प्रमुख उपस्थित होते.

पालकमंत्री बापट यांनी पुणे, सातारा आणि सोलापूर जिल्ह्यातील विविध विभागांच्या अधिकाऱ्यांकडून आषाढी वारीच्या पूर्व तयारीचा आढावा घेतला. तिन्ही जिल्ह्यातील अधिकाऱ्यांनी तयारीचे सादरीकरण केले.

पंढरपूरची आषाढी वारी हा महाराष्ट्रातील जनतेच्या श्रध्देचा विषय आहे. राज्यातील कानाकोपऱ्यातून लाखो वारकरी पांडुरंगाच्या दर्शनाला येत असतात. या वारकऱ्यांना केंद्रबिंदू मानून पंढरपूरच्या आषाढी वारीची तयारी करण्याच्या सूचना पालकमंत्री बापट यांनी दिल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)