पुणे बोर्डात पुणे जिल्ह्याचीच बाजी

संग्रहित छायाचित्र

निकाल 89.84 टक्‍के : निकालाची टक्‍केवारी घसरली
– 35 विद्यार्थ्यांचे निकाल ठेवले राखीव

प्रभात वृत्तसेवा
पुणे,दि.30 – राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे विभागीय मंडळाचा निकाल मागील वर्षीच्या तुलनेत यंदा दीड टक्‍क्‍याने घसरला आहे. मागील वर्षी पुणे विभागाचा निकाल 91.16 टक्‍के इतका होता तर यंदा या निकाल नव्वदीच्या आता लागला असून निकालाची टक्‍केवारी 89.58 इतकी आहे. पुणे विभागीय बोर्डांतर्गत येणाऱ्या सोलापूर, पुणे व अहमदनगर जिल्ह्यापैकी काही पॉइंटच्या फरकाने पुणे जिल्ह्याने बाजी मारली आहे. पुणे जिल्ह्याचा निकाल 89.84 टक्‍के, अहमदनगरचा 89.25 टक्‍के व सोलापूर जिल्ह्याचा निकाल 89.36 टक्‍के लागला आहे.
पुणे विभागांतर्गत येणाऱ्या तीन जिल्ह्यामधून यंदा 2 लाख 35 हजार 502 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी 2 लाख 10 हजार 853 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तसेच यंदा 9 हजार 95 पुनर्परीक्षार्थींनी परीक्षा दिली त्यातील 2 हजार 794 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून त्यांच्या निकालाची टक्‍केवारी 30.72 टक्‍के आहे. नियमित व पुनर्परीक्षार्थी मिळून पुणे विभागाचा एकूण निकाल हा 87.39 असल्याची माहिती पुणे विभागीय मंडळाचे अध्यक्ष तुकाराम सुपे यांनी दिली.
दरम्यान, निकालाच्या वैशिष्ट्यांमध्ये तीनही जिल्ह्यात विज्ञान शाखेचा निकाल सर्वाधिक आहे त्यानंतर वाणिज्य शाखेचा निकाल आहे व सर्वात कमी कला शाखेचा निकाल लागला आहे. पुणे विभागात एकूण 38 गैरमार्गाच्या घटना आढळल्या आहेत. तर काही कारणास्तव 35 विद्यार्थ्यांचे निकाल राखीव ठेवण्यात आले आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

निकालाची टक्‍केवारी
जिल्हा 2018 2017
पुणे जिल्हा 89.84 90.59
अहमदनगर जिल्हा 89.25 92.14
सोलापूर जिल्हा 89.36 91.32

एकूण 89.58 91.16

शाखानिहाय टक्‍केवारी
विज्ञान 96.76
वाणिज्य 90.71
कला 77.22
एमसीव्हीसी 83.75

पुणे विभाग
नोंदणी झालेले विद्यार्थी – 2,35747
परीक्षेला उपस्थित विद्यार्थी -2,35,502
उत्तीर्ण झालेले विद्यार्थी -2,10,963

पुणे जिल्हा
नोंदणी झालेले विद्यार्थी 1,22,108
परीक्षेला उपस्थित विद्यार्थी 1,21,993
उत्तीर्ण झालेले विद्यार्थी 1,09,601

अहमदनगर जिल्हा
नोंदणी झालेले विद्यार्थी 62,206
परीक्षेला उपस्थित विद्यार्थी 62,141
उत्तीर्ण झालेले विद्यार्थी 55,461
एकूण निकालाची टक्‍केवारी 89.25
विज्ञान शाखेचा निकाल 97.29
वाणिज्य शाखेचा निकाल 92.75
कला शाखेचा निकाल 75.46
व्होकेशनलचा निकाल 81.66

सोलापूर जिल्हा
नोंदणी झालेले विद्यार्थी 51,433
परीक्षेला उपस्थित विद्यार्थी 51,368
उत्तीर्ण झालेले विद्यार्थी 45901
एकूण निकालाची टक्‍केवारी 89.36
विज्ञान शाखेचा निकाल 97.94
वाणिज्य शाखेचा निकाल 92.93
कला शाखेचा निकाल 79.92
व्होकेशनलचा निकाल 85.64

गल्ली ते दिल्ली मुलींचीच सरशी
पुणे विभागाच्या निकालात मुलांच्या तुनलेत मुलींची उत्तीर्णतेची टक्‍केवारी चांगली आहे. पुणे विभागीय बोर्डात मुलांचे उत्तीर्णतेचे प्रमाण 85.90 टक्‍के आहे तर मुलींचे उत्तीर्णतेचे प्रमाण 94.34 आहे. नियमित व पुनर्परीक्षार्थी धरुन तिनही जिल्ह्यांमध्ये मुलीच आघाडीवर असल्याचे दिसत आहे. पुणे जिल्ह्यात मुलांचा निकाल 82.73 तर मुलींचा निकाल 92.96 लागला आहे. नगर जिल्ह्यातही मुलांचा निकाल 83.91 व मुलींचा 93.70 टक्‍के आणि सोलापूर जिल्हयातही मुलांचा निकाल 83.29 टक्‍के व मुलींचा निकाल 94.95 टक्‍के लागला आहे. गल्लीपासून ते अगदी सीबीएसईच्या निकालापर्यंत पाहिले असता अगदी दिल्लीपर्यंत मुलींचीच सरशी कायम आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)