पुणे बार असो. निवडणुकीसाठी उद्या मतदान

सायंकाळी 6.30 नंतर होणार मतमोजणी


सुमारे साडेचार हजार वकील करणार मतदान

पुणे – वकिलांची शिखर संघटना असलेल्या पुणे जिल्हा बार असोसिएशनच्या निवडणुकीसाठी गुरूवारी (दि. 31 जानेवारी) सकाळी 9.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत मतदान होणार आहे. त्याच्यदिवशी सायंकाळी 6.30 नंतर मतमोजणीस सुरूवात होणार असल्याची माहिती मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी आणि बार कौन्सील ऑफ महाराष्ट्र आणि गोवाच्या शिस्तपालन समितीचे माजी सदस्य अॅड. बिपीन पाटोळे यांनी दिली.

अध्यक्षपदाची लढत अॅड. श्रीकांत अगस्ते, अॅड. चंद्रशेखर जगताप, अॅड. ज्ञानेश्‍वर कामठे आणि अॅड. प्रमोद पाटील यांच्यात होणार आहे. उपाध्यक्षपदाच्या 2 जागांसाठी अॅड. राजश्री अडसुळ, अॅड. देवानंद ढोकणे, अॅड. रुपेश कलाटे, अॅड. रवी लाढाणे, अॅड. इब्राहिम शेख आणि अॅड. मोनिका वाडकर हे निवडणूक रिंगणात आहेत.
सचिव पदाच्या दोन जागांसाठी अॅड. कृष्णा भांगरे, अॅड. अंकुशराजे जाधव, अॅड. मनीष मगर, अॅड. पुष्कर पाटील, अॅड. रमेश राठोड आणि अॅड. केदार शिंदे नशीब अजमावत आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

हिशेब तपासणीस पदासाठी अॅड. विकास बाबर आणि अॅड. नागेश जेधे यांच्यात दुरंगी लढत होणार आहे. तर, खजिनदार म्हणून अॅड. सचिनकुमार गेलडा यांची यापूर्वीच निवड बिनविरोध निवड झाली आहे.

अॅड. अफताब बागवान, अॅड. अमोल भोसेकर, अॅड. प्रशांत चांदणे, अॅड. ऋषिकेश धुमाळ, अॅड. अर्चना गायकवाड, अॅड. सूरज गलांडे, अॅड. गिरीराज गोफणे, अॅड. तुषार कुऱ्हाडे, अॅड. प्रशांत वाटविसावे आणि अॅड. तृषांत वेडे यांची कार्यकारिणी सदस्यपदी निवड झाली आहे. सुमारे साडेचार हजार वकील या निवडणुकीसाठी मतदान करणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)