पुणे: बारावीच्या निकालातही मुलीच सरस

निकाल यंदा 1.09 टक्‍क्‍यांनी घटला


रीपिटर विद्यार्थ्यांचा निकाल 34.30 टक्‍के


दिव्यांग विद्यार्थ्यांचा निकाल 91.78 टक्‍के


मुलींचे उत्तीर्णतेचे प्रमाण मुलांपेक्षा 7 टक्‍क्‍यांनी अधिक

राज्याचा निकाल 88.41 टक्‍के : 92.36 टक्‍के विद्यार्थीनी उत्तीर्ण
यंदाही कोकण विभागाचा सर्वाधिक निकाल

पुणे – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात आलेल्या इयत्ता बारावीचा निकाल बुधवारी दुपारी एक वाजता ऑनलाइन जाहीर झाला. बारावीचा राज्याचा एकूण निकाल 88.41 टक्‍के इतका लागला आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा बारावीचा निकाल 1 टक्‍क्‍याने घटला आहे. निकालातही यंदाही मुलींचे उत्तीर्णचे प्रमाण मुलांपेक्षा 7.13 टक्‍क्‍यांनी अधिक आहे. कोकण विभागाचा सर्वाधिक निकाल 94.85 टक्‍के, तर सर्वात कमी निकाल नाशिक विभागाचा 86.13 टक्‍के आहे. पुणे विभागाचा निकाल 89.58 टक्‍के इतका लागला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

राज्य शिक्षण मंडळाच्या अध्यक्षा शंकुतला काळे म्हणाल्या, बारावी परीक्षेसाठी एकूण 14 लाख 16 हजार 986 विद्यार्थी बसले होते. त्यापैकी 12 लाख 52 हजार 817 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, निकालाची टक्‍केवारी 88.41 आहे. बारावीला 7 ल ाख 83 हजार 896 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी 6 लाख 68 हजार 125 विद्यार्थी उत्तीर्ण ठरले. मुलांची उत्तीर्णचे प्रमाण 85.23 टक्‍के इतके आहे. तसेच, बारावीला 6 लाख 33 हजार 90 विद्यार्थिनी परीक्षा दिल्या. त्यापैकी 5 लाख 84 हजार 692 मुली उत्तीर्ण ठरल्या असून, मुलींचे उत्तीर्णचे प्रमाण 92.36 एवढी आहे. मुलींचे उत्तीर्णचे प्रमाण मुलांपेक्षा 7.13 टक्‍क्‍यांनी जास्त आहे.

राज्याच्या निकालात यंदाही कोकण विभागाने बाजी मारली, तर सर्वात कमी निकाल नाशिक विभागाचा लागला आहे. त्यानंतर अनुक्रमे कोल्हापूर विभागाचा 91 टक्‍के, तर पुणे विभागाचा क्रमांक लागतो. पुनर्पपरीक्षार्थी (रीपिटर) विद्यार्थ्यांचा निकाल 34.30 टक्‍के इतका लागला आहे. राज्यात 66 हजार 456 पुनपर्रीक्षार्थी विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी 22 हजार 792 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. अपंग विद्यार्थ्यांचा निकाल 91.78 टक्‍के एवढा लागला आहे.

12 जून रोजी मूळ मार्कलिस्ट मिळणार
विद्यार्थ्यांना मूळ गुणपत्रिका मंगळवार, दि. 12 जून रोजी संबंधित कनिष्ठ महाविद्यालयात मिळणार आहे. महाविद्यालयातून दुपारी तीन वाजता विद्यार्थ्यांना गुणपत्रिका दिले जाणार आहे. निकालानंतर दुसऱ्या दिवसांपासून गुणपडताळणी व उत्तरपत्रिका छायाप्रत (फोटोकॉपी) प्राप्त करून घेण्यासाठी अर्ज स्वीकारण्यात येणार आहे. त्यासाठी एकच फार्म उपलब्ध करून देण्यात आला आहे. अर्जासोबत गुणपत्रिकेची प्रत (वेबसाईटवरील प्रिंटआऊट) जोडणे आवश्‍यक आहे. गुण पडताळणीसाठी अर्ज करावयाची मुदत दि. 31 मे ते 9 जून असा कालावधी देण्यात आला आहे.

2,300 शाळांचा निकाल शंभरी, तर 48 शाळांचा निकाल 0 टक्‍के
राज्यात एकूण 2 हजार 301 कनिष्ठ महाविद्यालयांचा शंभर टक्‍के लागला आहे. त्यामध्ये पुण्यातील 502 शाळांचा समावेश आहे. विज्ञान शाखेत 308, वाणिज्य शाखेत 127, कला शाखेत 54 तर एमसीव्हीसीमध्ये 13 शाळांचा निकाल शंभर टक्‍के लागला आहे. तर एकूण राज्यात विज्ञान विभागाच्या 1 हजार 356, कला शाखेच्या 290, वाणिज्य शाखेच्या 594 आणि एमसीव्हीसीच्या एकूण 61 शाळांचे निकाल शंभर टक्‍के लागले आहेत. याउलट एकही विद्यार्थी उत्तीर्ण झालेला नाही, अशा कनिष्ठ महाविद्यालयांची संख्या 48 आहे. त्यामध्ये विज्ञान विषयाच्या 10, कला शाखेच्या 26 , वाणिज्य शाखेच्या 11 तर एमसीव्हीसीच्या एका शाळेचा यात समावेश आहे. यामध्ये पुणे विभागीय मंडळातील चार शाळांचा समावेश असून त्यातील चार कला शाखेच्या आहेत तर एक विज्ञान शाखेची शाळा आहे.

उत्तरपत्रिका जळाल्याप्रकरणी 14 जण निलंबित
बीड जिल्ह्यातील केज तालुक्‍यात तेराशे उत्तरपत्रिका जळाल्याप्रकरणी संबंधित 14 जणांना निलंबित करण्यात आल्याची माहिती राज्य शिक्षण मंडळाच्या अध्यक्षा शंकुतला काळे यांनी दिली. मात्र ज्या विद्यार्थ्यांचे उत्तरपत्रिका जळीत खाक झाल्या आहेत, अशा विद्यार्थ्यांना इतर विषयाचे गुण पाहून सरासरी गुण देण्यात आले आहे. अशा घटना घडू नये, यासाठी मंडळामार्फत योग्य ती खबरदारी घेण्यात येणार असल्याचे त्यांनी नमूद केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)