पुणे: प्रबोधीनीचे कॅडेट हे युवकांसाठी आदर्श

सुभेदार मेजर राजीव कुमार यांना वाहिली आदरांजली
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचे परेड प्रशिक्षक सुभेदार मेजर राजीव कुमार यांची आठवण करत, त्यांना आदरांजली वाहिली. कुमार यांचा विद्यार्थ्यांना परेड प्रशिक्षण देत असताना हृदयविकाराच्या झटक्‍याने 23 मे रोजी मृत्यू झाला होता. दीक्षांत सोहळ्यानिमित्त संबोधन करण्यापूर्वी राष्ट्रपती कोविंद यांनी कुमार यांना श्रद्धांजली अर्पीत केली.

राष्ट्रपती रामनाथ कोविंद : राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी दीक्षांत संचलन

पुणे – प्रबोधीनीचे कॅडेट हे युवकांसाठी आदर्श आहेत. देशाचे संरक्षण, शांतता आणि समृद्धीचे रक्षण करण्याची जबाबदारी तुमच्या खांद्यावर आहे. आजपर्यंत प्रबोधिनीतून उत्तीर्ण झालेल्या अधिकाऱ्यांनी जी शौर्य गाजवले आहेत, ती परंपरा तुम्ही पुढे न्यावी, अशा शब्दात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी प्रबोधिनीच्या उत्तीर्ण विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

 

राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या 134 व्या तुकडीचा दीक्षांत संचलन समारोह बुधवारी झाला. यावेळी एअर अडमिरल एस. के. गरेवाल, सैन्याच्या दक्षिण मुख्यालयाचे प्रमुख लेफ्टनंट जनरल डी. आर. सोनी, प्रबोधिनीचे प्रमुख एअर मार्शल आय. पी. विपीन, इंटिग्रेटेड आर्मी स्टाफचे प्रमुख लेफ्टनंट जनरल सतीश दुआ, नौदलाचे प्रमुख अडमिरल सुनील लांबा उपस्थित होते. राष्ट्रपतींच्या हस्ते अक्षत राज याला प्रेसीडेंन्ट मेडल, मोहंमद सोहील इस्लाम याला रौप्य पदक तर अली अहमद चौधरी याला कास्य पदक प्रदान करण्यात आले.

कोविंद म्हणाले, सैन्याचा तिन्ही दलाचा प्रमुख म्हणून या समारंभात उपस्थित राहाणे हा माझ्यासाठी अभिमानाचा क्षण आहे. आतापर्यंत सियाचीन, काश्‍मीर, लडाख अशाविविध ठिकाणी भेट देऊन सैन्याची कामगिरी जवळून पाहिली आणि ती अतिशय चांगली आहे, असे मला मनापासून वाटते. प्रबोधिनीचे “सेवा परमो धर्म’ कॅडेटनी आपल्या मनावर बिंबवून घ्यावे आणि त्यानुसार देशसेवा करावी.

राष्ट्रपती सुवर्ण पदकाचा मानकरी ठरल्याने आज मला खूप समाधान मिळाले आहे. हे मी माझ्या आईवडीलांमुळे शक्‍य करू शकलो. त्यांनी मला या प्रतिष्ठीत संस्थेत येण्यास परवानगी दिली आणि मला नेहमी प्रोत्साहित केले. या ठिकाणी आल्यावर येथील प्रशिक्षकांनी केलेल्या मार्गदर्शनामुळे हे खडतर प्रशिक्षण पूर्ण केले. तीन वर्षांत एकी, शिस्त आणि टीम स्पिरीट शिकलो. आर्मी कॅडेट असल्यामुळे भारतीय लष्करात दाखल व्हायचे आहे.
– अक्षत राज, राष्ट्रपती सुवर्ण पदकाचा मानकरी

लहाणपणी इंजिनिअर व्हायचे होते. पण वडील लष्करात होते. मी सुद्धा लष्करात अधिकारी होवून त्यांची ईच्छा पूर्ण करावी अशी त्यांची ईच्छा होती. यामुळे मी सुद्धा लष्करात दाखल होण्याचा निर्णय घेतला. एनडीएमध्ये येण्यासाठी मला त्यांचे मार्गदर्शन मिळाले. आई वडीलांचे प्रोत्साहन, एनडीएतील ड्रील प्रशिक्षक तसेच वर्गातील उत्साद यांच्या मार्गदर्शनामुळे मी माझे येथील तीन वर्ष यशस्वी पणे पूर्ण करू शकलो. आजच्या संचलन सोहळ्याचे नेतृत्व करताना खूप आनंद होत आहे. माझ्या आयुष्यातील हा महत्त्वाचा क्षण आहे. मी आर्मी कॅडेट असल्याने इंडीयन मिलीटरी ऍकॅडमीत जाणार असून त्यानंतर पायदळात दाखल होणार आहे.
– सोहेल इस्लाम, रौप्य पदक विजेता

माझे वडील हे लष्करातून सुभेदार म्हणून निवृत्त झाले. यामुळे मी लहाणपणापासून लष्करी अधिकारी पाहात होतो. त्यामुळे लष्करात अधिकारी व्हायचे हे स्वप्न होते. सैनिक स्कूलमध्ये शिक्षण झाल्यामुळे मी ही परीक्षा पास होऊ शकलो. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनितील तीन वर्षांचे प्रशिक्षण खूप खडतर होते. यामुळे शारिरीक, मानसिकरित्या आम्ही सक्षम झालो. मी माझ्या आई-वडिलांचे आणि भावाचे खूप आभार मानतो. त्यांच्या पाठींब्यामुळे आणि प्रोत्साहनामुळे मी हे तीन वर्षांचे प्रशिक्षण पूर्ण करू शकलो.
– अली अहमद चौधरी, कांस्य पदक विजेता

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)