पुणे : प्रदूषणाकडे लक्ष वेधण्यासाठी आत्महत्येचा प्रयत्न

करमाळा येथील शेतकऱ्यावर गुन्हा दाखल


साखर आयुक्‍तालयात आंदोलनादरम्यान प्रकार

पुणे – करमाळा येथील कारखान्यांच्या बॅगस प्रकल्पामुळे श्रीदेवीचा माळ गावात होणाऱ्या प्रदूषणाकडे लक्ष वेधण्यासाठी आंदोलनकर्त्या शेतकऱ्याने साखर आयुक्त कार्यालयातील छतावरुन उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला.

प्रहार संघटनेने साखर-संकुलावर बुधवारी मोर्चा काढला होता. त्यावेळी ही घटना घडली. संघटनेचे पश्‍चिम महाराष्ट्र संपर्कप्रमुख अतुल खपसे-पाटील यांच्या नेतृत्त्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. यावेळी सांगली येथील शिवाजी केन शुगर कारखान्याकडील थकीत ऊस बिलाचा प्रश्‍न आंदोलनकर्त्यांकडून मांडण्यात आला. करमाळा व सांगलीतील बत्तीसशिराळा परिसरातील शेतकरी सहभागी झाले होते. प्रहारचे कार्यकर्ते साखर संकुलावर आल्यानंतर आयुक्तालयातील अधिकाऱ्यांशी संघटनेच्या शिष्टमंडळाने चर्चा केली. यावेळी एका शेतकऱ्यांने छतावरुन उडी मारण्याचा प्रयत्न केल्याने खळबळ उडाली. खुपसे यांनी या कार्यकर्त्याला वेळीच आवरल्याने अनर्थ टळला. रामचंद्र शंकर देशमुख असे त्यांचे नाव आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

या घटनेनंतर काही वेळातच साखर आयुक्त शेखर गायकवाड कार्यालयात दाखल झाले. आंदोलक शेतकऱ्यांनी त्यांच्यापुढे आपले म्हणणे मांडले. त्यावर आयुक्तांनी मोबाइलद्वारे संबंधित कारखान्याच्या संचालकांशी संवाद साधला. या चर्चेत दि.27-28 जानेवारीला शेतकऱ्यांसोबत बैठक घेण्याचे आश्‍वासन संचालकांनी दिल्याचे आयुक्तांनी आंदोलनकर्त्यांना सांगितले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)