पुणे – पोस्टात विमा प्रतिनिधींची भरती

9 फेब्रुवारीपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

पुणे – पोस्टाच्या जीवन विमा योजना आणि ग्रामीण टपाल जीवन विमा योजनेंतर्गत असणाऱ्या विविध विमा योजनांच्या विक्रीसाठी विमा प्रतिनिधींची नेमणूक शिवाजीनगर पुणे ग्रामीण विभाग, अधीक्षक डाकघर यांच्यामार्फत थेट मुलाखतीद्वारे केली जाणार आहे. खाली नमूद केलेल्या अटींची पूर्तता असणाऱ्या इच्छुक उमेदवारांनी अधीक्षक डाकघर, पुणे ग्रामीण विभाग, शिवाजीनगर यांच्या कार्यालयात 9 फेब्रुवारी 2019 पर्यंत अर्ज पाठवावेत, असे आवाहन पुणे ग्रामीण डाक विभागाच्या अधीक्षकांनी केले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

अर्ज पाठवताना उमेदवाराने आवश्‍यक कागदपत्रे, जन्म तारखेचा दाखला, शैक्षणिक पात्रतेची आवश्‍यक कागद पत्रे तसेच या क्षेत्रातील अनुभव असल्यास त्या बाबतची कागद पत्रे पाठवावीत.

शैक्षणिक पात्रतेमध्ये 5,000 पेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या भागात राहणारा उमेदवार हा 10 वी पास असावा तसेच 5,000 आणि त्या पेक्षा जास्त लोकसंख्या असणाऱ्या भागात राहणारा उमेदवार हा 12 वी पास असणे आवश्‍यक आहे.

वय वर्षे 18 ते 60 पर्यंत चालणार आहे. कोणत्याही कंपनीचे माजी विमा प्रतिनिधी/माजी जीवन सल्लागार, अंगणवाडी कर्मचारी, महिला मंडळ कर्मचारी, स्वयंसेवी संघटना चालक, माजी सैनिक, निवृत्त शिक्षक, बेरोजगार/स्वयंरोजगार असणारे तरुण, तरुणी किंवा वरील पात्रता असणारे इच्छुक उमेदवार अर्ज पाठवू शकतात. इच्छुक उमेदवारांनी विमा पॉलिसी विक्रीचा अनुभव, संगणकाचे ज्ञान, स्थानिक भागाची पूर्णत: माहिती असणे अपेक्षित आहे.

उमेदवाराची निवड 10 वीच्या गुणांवर तसेच उच्च शैक्षणिक पात्रता आणि मुलाखतीत मिळालेल्या गुणावर केली जाईल. उमेदवाराने आपले अर्ज रजिस्टर/स्पीड पोस्टद्वारे साध्या कागदावर शैक्षणिक पात्रता आणि संबंधित प्रमाणपत्राच्या प्रतिसह लिफाफ्यावर डाक जीवन विमा/ग्रामीण डाक जीवन विमा एजंटची नियुक्ती असे लिहून, अधीक्षक डाकघर, पुणे ग्रामीण विभाग, पुणे 411 005 यांचे नावे (अर्ज) दि. 09.02.2019 पर्यंत पोहचतील असे पाठवावे. अधिक माहितीसाठी कृपया www.maharashtrapost.gov.in या वेबसाईटला भेट द्यावी, असेही पुणे ग्रामीण विभागाचे अधीक्षक डाकघर यांनी कळवले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)