पुणे पोलिसांचे ऑपरेशन ऑल आऊट

शहरातील 61 बार व पब, 31 मसाज पार्लर, 7 लॉजेस आणी 150 तडीपार गुन्हेगारांची तपासणी
पुणे,दि.18- पुणे पोलिसांनी गुन्हेगार आणी अवैध्य धंद्याना चाप बसावा यासाठी “ऑपरेशन ऑल आऊट’ राबवले. अप्पर पोलीस आयुक्त (गुन्हे) अशोक मोराळे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविलेल्या विशेष मोहिमेत शहरातील 61 बार व पब, 31 मसाज पार्लर, 7 लॉजेस आणी 150 तडीपार गुन्हेगारांची तपासणी करण्यात आली. यामध्ये उपायुक्त(सायबर व आर्थिक गुन्हे) संभाजी कदमल सहायक पोलीस आयुक्त डॉ.शिवाजीराव पवार, विजय चौधरी, 17 वरिष्ठ पोलीस निरीक्षक 19 सहायक पोलीस निरीक्षक/उपनिरीक्षक आणी 109 पोलीस कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.
या कारवाईमध्ये एकूण 150 तडीपार गुन्हेगार चेक करण्यात आले. त्यामधील 13 गुन्हेगार कारागृहात असल्याचे आढळून आले. मोका कारवाई अंतर्गत फरार असलेले गुन्हेगारसुध्दा चेक करण्यात आले. तसेच शरीराविरुध्द आणी संघटीतपणे गुन्हेगारी करणाऱ्या टोळ्यांमधील 31 सराईत गुन्हेगारांना चेक करण्यात आले. त्यांच्या सध्याच्या हालचालींबद्दल माहिती घेण्यात आली असून, यापैकी सहा आरोपी सध्या कारागृहात असलयाचे आढळून आले. पोलीस आयुक्तलय कार्यक्षेत्रीतील 61 हॉटेल, बार, पब चेक केले. त्यापैकी तीन अस्थापना विहीत वेळेनंतरही बेकायदा सुरु ठेवल्याचे निदर्शणास आले. त्यांच्या विरुध्द खटले दाखल करण्यात आले आहेत. तसेच सात लॉजेसही चेक करण्यात आल्या. शहरातील 31 मसाज पार्लर चेक करण्यास आले असून त्यापैकी एका मसाज पार्लरवर कारवाई करण्यात आली. येथे थालयंड देशाचे नागरिकत्व असलेल्या चार महिला आढळल्या. त्यांना ताब्यात घेऊन पुढील कारवाईसाठी कोरेगाव पार्क पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.