पुणे: पैसे थेट विद्यार्थ्यांच्या बॅंक खात्यात

…म्हणून घ्यावा लागला निर्णय
गेल्या अनेक वर्षांपासून महापालिका शाळांतील विद्यार्थ्यांना पुरवल्या जाणाऱ्या गणवेश आणि शालेय साहित्यामध्ये घोटाळे, भ्रष्टाचार असे प्रकार होत होते. याप्रकारामुळे विद्यार्थ्यांना अक्षरश: शैक्षणिक वर्ष संपतानाच गणवेश आणि शालेय साहित्य हातात मिळत होते. त्यामुळे या प्रकारात पारदर्शकता आणण्यासाठी महापालिका प्रशासनाने मागील वर्षी डीबीटी कार्डचा पर्याय काढला मात्र त्यावरही आक्षेप नोंदवण्यात आले. यासाठी यंदा विद्यार्थ्यांच्या खात्यातच रक्कम जमा करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे मुळीक म्हणाले.

पाहिजे त्या दुकानातून करता येणार शालेय साहित्य खरेदी

महापालिका स्थायी समितीचा महत्त्वाचा निर्णय

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पुणे – शालेय साहित्य खरेदीसाठी महापालिका शाळांतील विद्यार्थ्यांच्या बॅंक खात्यांवर थेट रुपये जमा करण्याचा मंगळवारी स्थायी समितीने निर्णय घेतला. 12 ते 14 जून दरम्यान हे पैसे खात्यावर जमा करण्यात येणार असल्याचे, स्थायी समिती अध्यक्ष योगेश मुळीक यांनी सांगितले. यावेळी संबंधित विभागाचे उपायुक्त तुषार दौंडकर उपस्थित होते. या निर्णयामुळे हव्या त्या दुकानातून पालकांना शालेय साहित्य खरेदी करता येणार आहे.

मागीलवर्षी डीबीटी कार्डद्वारे रुपये देण्याचा प्रयोग केला गेला. मात्र त्यावर आक्षेप घेण्यात आले. त्यामुळे यंदाच्यावर्षी थेट बॅंकखात्यातच रुपये जमा करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. त्यामुळे मुलांना हव्या त्या दुकानातून, हव्या त्या प्रतीचे गणवेशासह साहित्य खरेदी करता येणार आहे. तसेच गणवेशाचा रंगही मागील वर्षीप्रमाणेच ठेवण्यात आला आहे.

महापालिका 287 शाळांमधून विद्यार्थ्यांची पटसंख्या सुमारे एक लाख आठ हजार 475 आहे. त्यापैकी 96 हजार 475 विद्यार्थी प्राथमिक मध्ये तर 12 हजार विद्यार्थी माध्यमिक मध्ये शिक्षण घेत आहेत. या विद्यार्थ्यांच्या शालेय साहित्यासाठी सुमारे 16 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. याशिवाय समाविष्ट झालेल्या गावांतील विद्यार्थ्यांची संख्या यामध्ये समाविष्ट केली जाणार असल्याचे दौंडकर यांनी सांगितले.

सध्या प्राथमिकच्या 52 हजार आणि माध्यमिकच्या 12 हजार विद्यार्थ्यांच्या बॅंक खात्याचे तपशील महापालिकेकडे आहेत. उर्वरीत विद्यार्थ्यांच्या पालकांच्या बॅंक खात्यांवर रक्कम जमा केली जाणार आहे. तत्पूर्वी याखात्यांची सत्यता पडताळून पाहिली जाणार असल्याचे दौंडकर यांनी स्पष्ट केले.

शालेय साहित्यामध्ये गणवेश, स्वेटर, रेनकोट, वह्या, बूट आणि बालवाडीच्या विद्यार्थ्यांसाठी पाटी-पेन्सिलचा समावेश आहे. या वस्तूंचे बाजारमूल्य पडताळूनच विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा केली जाणारी रक्कम ठरवण्यात आल्याचे दौंडकर यांनी सांगितले.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)