पुणे: पुनर्वसित गावठाणांतील भूखंड विक्रीचा मार्ग मोकळा

व्यवहारांवर असलेले निर्बंध शासनाने उठविले : पूर्वीची अटही रद्द

पुणे- पुनर्वसित गावठाणांमध्ये वाटप झालेल्या भूखंडाचे हस्तांतरण किंवा खरेदी-विक्री व्यवहारावर असलेले निर्बंध शासनाने उठविले आहे. तसेच भूखंड विक्रीची परवानगी देण्यासाठी ठेवण्यात आलेली 10 वर्षांच्या कालावधीची अटही शासनाने रद्द केली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पाटबंधारे प्रकल्पामुळे बाधित झालेल्या क्षेत्रातील व्यक्तींचे पुनर्वसन प्रकल्पाच्या लाभक्षेत्रातील संपादित जमिनीवर गावठाण निर्माण करून करण्यात येते. पुनर्वसित गावठाणामध्ये बाधित कुटुंबांना घर बांधण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्यात तेरे. प्रकल्पग्रस्तांना वाटप करण्यात आलेल्या भूखंडाची विक्री करण्याची परवानगी जिल्हा प्रशासनाकडून घ्यावी लागते. तसेच जागेचे वाटप झाल्यानंतर 10 वर्षांनी ही जमीन विकता येते. 10 वर्षांचा कालावधी झाल्यास त्यांच्याकडून कोणतीही रक्कम न घेता भूखंड विक्री परवानगी देण्यात येते.

ही सर्व प्रक्रिया वेळखाऊ असते. पुनर्वसित गावठाणामध्ये वाटप केलेले भूखंड विक्री करण्याची परवानगी देण्यास अनावश्‍यक विलंब होतो. तसेच भूखंड विकून किंवा भोगवटा विषयक स्थिती बदलून तो हस्तांतरित करन्यास संबधित प्रकल्पग्रस्तास अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. प्रकल्पबाधित व्यक्तीचे विस्थापन झाल्यामुळे त्याचे पुनर्वसन करणे महाराष्ट्र प्रकल्पबाधित व्यक्तींचे पुनर्वसन अधिनियम 1999 नुसार बंधनकारक आहे.

प्रकल्पामुळे विस्थापित झालेल्या बाध्य व्यक्तीस पुनर्वसित गावठाणामध्ये वाटप केलेला भूखंड हा त्याच्या मालकीचा असणे आवश्‍यक आहे. पुनर्वसित गावठाणामध्ये सातबारा उताऱ्यावर भोगवटादार वर्ग-2 म्हणून वाटप झालेल्या भूखंडाचे भोगवटादार वर्ग-1 मध्ये रुपांतर करण्याबाबत आणि सदरच्या भूखंडाच्या हस्तांतरण व्यवहारावर असलेले निर्बंध उठविण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्यानुसार शासनाने पुनर्वसित गावठाणांमध्ये भूखंडाचे हस्तांतरणावरील बंदी उठविली आहे.

पुनर्वसन अधिनियमानुसार पात्र प्रकल्पग्रस्तांना राहण्यासाठी देण्यात येणारे भूखंड हे भोगवटादार वर्ग-1 म्हणून वाटप करण्यात येणार आहे. तसेच भूखंड विक्रीची परवानगी देण्यासाठी ठेवण्यात आलेल्या 10 वर्षाच्या कालावधीची अटही शासनाने रद्द केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)