पुणे – पुणे-सोलापूर एसटी वाहतूक पुन्हा ठप्प

पुणे – सोलापूर जिल्ह्यात सुरू असलेल्या मराठा समाज आंदोलनामुळे पुणे-सोलापूर मार्गावरील एसटी वाहतूक दिवसभरासाठी दोन्ही बाजूने बंद ठेवण्यात आली होती. तर, चाकणमध्ये मोर्चाला हिंसक वळण लागल्याने भीमाशंकर, नाशिककडे जाणारी एसटी वाहतूक दुपारनंतर बंद करण्यात आली.

सोमवारी स्वारगेट येथून सोलापूरसाठी एकही एसटी सोडण्यात आली नाही. तर, सोलापूरमध्ये आंदोलन तीव्र झाल्याने सोलापूरहूनदेखील पुण्याला एसटी आली नाही. दोन्ही बाजूच्या जवळपास 25 -30 फेऱ्या रद्द कराव्या लागल्या. दरम्यान, चाकण येथे काही वाहने जाळण्यात आली. यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने या मार्गावरील वाहतूकही दुपारनंतर बंद ठेवण्यात आली. यामुळे नाशिक, भीमाशंकर, संगमनेर, नारायणगाव, आळेफाटा, राजगुरूनगरकडे जाणाऱ्या एसटीवर परिणाम झाला. दरम्यान, वाहतूक बंद राहणार असल्याची माहिती प्रवाशांना नसल्याने प्रवाशांनी स्थानकावर गर्दी केली होती. मात्र, आंदोलन तापल्याने अनेक फेऱ्या रद्द कराव्या लागल्या. त्यामुळे प्रवाशांना माघारी जावे लागले.
——————–

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)