पुणे – पीएमपीच्या थुंकीबहाद्दर कर्मचाऱ्यांसह आता प्रवासीही रडारवर

पुणे – बसेसची स्वच्छता ठेवण्यासाठी आणि प्रवाशांना दर्जेदार सुविधा देण्यासाठी “पीएमपीएमएल’ प्रशासनाने महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. त्याचाच एक भाग म्हणून थुंकीबहाद्दर प्रवासी आणि चालकांवर दंडात्मक कारवाई करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. त्याशिवाय त्यासाठी नेमण्यात आलेल्या पथकांच्या वतीने महत्त्वाच्या बसस्थानंकावरही नजर ठेवण्यात येणार आहे. त्यासाठी खास पथकांची नेमणूक करण्यात येणार असून या पथकातील साध्या वेषातील कर्मचारी या थुंकीबहाद्दरावर नजर ठेवणार आहेत, त्याची तात्काळ अंमलबजावणी करण्याच्या सूचना संबधित विभागाच्या वतीने देण्यात आल्या आहेत.

गेल्या काही महिन्यांच्या कालावधीत पीएमपीएमएलच्या बसेसमधील अस्वच्छता अधिकच वाढत चालली आहे. बहुतांशी चालक आणि प्रवासी तंबाखू, गुटखा आणि पान खाऊन थुंकत असल्याने बसेसमध्ये अस्वच्छता वाढत चालली आहे. त्याचा त्रास अन्य प्रवासी आणि विशेषत: महिला वर्गांना सहन करावा लागत आहे, यासंदर्भात बहुतांशी प्रवाशांनी पीएमपीएमएलच्या अध्यक्षा आणि व्यवस्थापकीय संचालिका नयना गुंडे यांच्याकडे लेखी तक्रारी केल्या होत्या. त्याशिवाय काही प्रवाशांनी बसमधील फोटो व्हॉटसऍपच्या माध्यमातून गुंडे यांना पाठविले होते, त्याची दखल घेऊन गुंडे यांनी या बसेस आठवड्यातून किमान दोनवेळा वॉशिंग करण्याच्या सूचना दिल्या होत्या. या आदेशाची तत्काळ अंमलबजावणी सुरू करण्यात आली होती, तरीही ही अस्वच्छता कमी झालेली नाही. त्यामुळे हे पाऊल उचलण्यात आले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.