पुणे – पीएमपीचे थुंकीबहाद्दर कर्मचारीही आता रडारवर

पुणे – “पीएमपी’ बस स्वच्छ ठेवण्यासाठी वरिष्ठ पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांनीच पुढाकार घेतला आहे. त्याचाच एक भाग म्हणून यापुढे पान, गुटखा अथवा तंबाखू खाऊन बसच्या केबिनमध्येच थुंकणाऱ्या चालकांवर प्रशासनाची “नजर’ असणार आहे. त्यासाठी खास पथकांची नेमणूक करण्यात येणार आहे.

बसेसमध्ये पान, गुटखा आणि तंबाखू खाऊन थुंकणाऱ्यामध्ये एसटी महामंडळ आणि पीएमपी चालकांची संख्या मोठी आहे. त्यामुळे बसेस अस्वच्छ दिसतात. दरम्यान, एसटी महामंडळाने गेल्याच महिन्यात अशा चालकांविरोधात राज्यभर मोहीम राबविली होती. या कारवाईत राज्यभरातील 254 आगारातील तब्बल अडीच हजार थुंकीबहाद्दर चालक जाळ्यात अडकले होते. त्यांच्यावर महामंडळाने दंडात्मक कारवाई केली होती.

त्याच धर्तीवर पीएमपीएमएल प्रशासनाच्या वतीनेही अशाच प्रकारची कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पीएमपीएमएल प्रशासनाचे शहर, उपनगर आणि पिंपरी-चिंचवड परिसरात 15 डेपो आहेत. या डेपोमध्ये बारा हजार चालक आणि वाहक कार्यरत आहेत. या स्वच्छतेची सुरुवात चालकांपासून करण्यात येणार आहे. त्यांना लगाम बसावा यासाठी खास पथकांची स्थापना करण्यात येणार आहे.

बसमध्ये साध्या गणवेशातील कर्मचारी अशा चालकांवर नजर ठेवणार आहेत. त्याबाबतचा अहवाल संबंधित डेपो आणि मुख्य कार्यालयाला सादर केल्यानंतर त्या चालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. त्यानुसार पुढील आठवड्यापासून या कारवाईला प्रत्यक्षात सुरुवात करण्यात येणार आहे
– नयना गुंडे, अध्यक्षा आणि व्यवस्थापकीय संचालक, पीएमपी


प्रशासनाचा हा निर्णय निश्‍चितपणे स्वागतार्ह आहे. याबद्दल प्रशासनाला पूर्णपणे सहकार्य करण्याची आमची तयारी आहे. त्याशिवाय चालकांमध्येही जनजागृती करण्यात येणार आहे.
– राजेंद्र खराडे, अध्यक्ष, पीएमटी कामगार संघाचे (इंटक)

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)