पुणे – पीएमपीएला पालिका देणार साडेचार कोटी रुपये

पुणे – मोफत बस पासपोटी पीएमपीएमएलला देय असलेली 4 कोटी 61 लाख 26 हजार 562 रुपये देण्याला स्थायी समितीने मंगळवारी मंजुरी दिली. स्थायी समिती अध्यक्ष योगेश मुळीक यांनी ही माहिती दिली.

महापालिका शाळातील विद्यार्थ्यांना, स्वातंत्र्य सैनिक, सामन्य प्रशासनातील सेवक, पदाधिकारी, चालक शिपाई यांना पीएमपीएमएलचे बसपास मोफत दिले जातात. त्याचे पैसे महापालिकेकडून पीएमपीएमएलला अदा केले जातात. त्यासाठी महापालिका प्रत्येक अंदाजपत्रकात तरतूद करते. यंदाच्या तरतुदीतून शिल्लक असलेली रक्कम पीएमपीएमएलला अदा करण्याविषयीचा हा प्रस्ताव आहे.

बसपासपोटी महापालिकेच्या 2018-19 च्या अंदाजपत्रकात 28 कोटी रक्कम तरतूद करण्यात आली आहे. एकूण तरतूद केलेल्या रक्कमेतील 25 कोटी 61 लाख 26 हजार 562 रुपये सन 2017-18 मध्ये वितरित केलेल्या बसपासपोटी पीएमपीएमएलला महापालिकेकडून देय आहे. या रक्कमेतून 21 कोटी एवढी रक्कम या आधीच उचल स्वरूपात पीएमपीएमएलला अदा केली आहे. त्यातील सात कोटी रुपये तरतूद शिल्लक आहे. ही 21 कोटी रुपये रक्कम समायोजित करून उर्वतिर 4 कोटी 61 लाख 26 हजार 562 रुपये पीएमपीएमएला देण्यासंदर्भातील हा प्रस्ताव आहे.

यामध्ये सर्वाधिक मोफत बसपास शालेय विद्यार्थ्यांना देण्यात आले असून, त्यापोटी 14 कोटी 12 लाख 27 हजार 773 इतकी रक्कम महापालिकेने पीएमपीएमएलला देय आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)